मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्याविरोधी उमेदवाराला मतं दिल्याची बाब विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी रेकॉर्डवर घेतली. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी रेकॉर्डवर घेणे हे पुढील न्यायालयीन कारवाईसाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची १६४ मतांनी निवड झाली त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचीही मते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मत न देता भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मत दिलं, त्यांची नावं रेकॉर्डवर घेण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. त्यांनी ती नावे, माहिती रेकॉर्डवरही घेतली.