मुक्तपीठ टीम
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मध्यप्रदेशातील काँग्रेसमधून भाजपावासी होऊन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी अपवित्र असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले ज्योतिरादित्य शिंदे?
- ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती.
- अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करेल.
ज्योतिरादित्य शिंदेंनीही केलेली बंडखोरी –
- ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेस पक्षामधून बंडखोरी केली होती.
- मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
- त्यांच्यासोबत समर्थक आमदारही पक्षातून बाहेर पडले होते.
- यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पडलं होतं.
- शिंदे गटाच्या समर्थनावर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते.
- मात्र शिंदेंनी राज्य सरकारमध्ये कोणतंही पद घेतलं नव्हतं.
- परंतु नंतर त्यांना भाजपाने राज्यसभेची खासदारकी तसंच केंद्रीय मंत्रीपदही दिलं.