मुक्तपीठ टीम
सीमावर्ती भागात हवामान अगदी थंड आणि परिस्थिती अगदी कठीण असते. परंतु या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पर्यनासाठी हे लोक जम्मू-काश्मिर आणि लडाख सारखे प्रदेश निवडतातच. तेथील सुंदरता हेच त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सीमावर्ती भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. देशभरात अशा ७५ ठिकाणी बोर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओने कॅफे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील १२ आणि लडाखमधील १४ अशा एकूण २६ बीआरओ कॅफे उघडण्यात येणार आहेत. बीआरओ कॅफे प्रवासाचा मार्ग आणखी सुलभ करेल. यासोबतच पर्यटकांनाही उत्तम सुविधा मिळणार आहेत.
बीआरओला दुर्गम सीमावर्ती भागात प्रवेश आहे. धोरणात्मक गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त, उत्तर आणि पूर्व सीमांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी बीआरो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. कठोर हवामान आणि भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी त्याच्या उपस्थितीच्या आधारावर, बीआरओने पर्यटकांना अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतला.
या योजनेमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार
- फूड प्लाझा आणि रेस्टॉरंटमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ तसेच लोकप्रिय खाद्यपदार्थ उपलब्ध असतील.
- बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसोबत मंत्रालयाने १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७५ ठिकाणी वेसाइड सुविधा उभारण्यास मान्यता दिली आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
- पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरविणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ४. यासोबतच सीमावर्ती भागात आर्थिक उपक्रमांना चालना मिळेल.
पर्यटकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांना बीआरओ कॅफे असे नाव दिले जाईल. या वेसाइड सुविधा परवाना आधारावर एजन्सीसह सार्वजनिक खासगी भागीदारी मोडमध्ये विकसित आणि चालवल्या जातील. बीआरओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची रचना, बांधणी आणि संचालन केले जाईल.
पर्यटकांना या सुविधा मिळणार आहेत
बीआरओ कॅफे पर्यटकांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, फूड प्लाझा, रेस्टॉरंट, पुरुष, महिला आणि अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रथमोपचार सुविधा, एमआय रूम इत्यादी सुविधा मिळणार आहे.
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील या ठिकाणी बीआरओच्या कॅफे होणार सुरू
- जम्मू-काश्मीरमध्ये बारा रस्ते विभाग निवडण्यात आले आहेत.
- यामध्ये टीपीए, त्रागबाल, हुसेनगाव, केएम ९५, केएम ११७.९०, केएम ५८, गलहार, सियोत, बथुनी, बुधल, कपोथा आणि सुरनकोट यांचा समावेश आहे.
- लडाखमध्ये १४ रस्ते निवडले गेले आहेत जेथे या सुविधा विकसित केल्या जातील.
- यामध्ये मतियान, कारगिल, मुलबेक, खालत्से, लेह, हुंडर, चोगलमसर, रुम्त्से, डेब्रिंग, पांग, सरचू, अघम, न्योमा आणि हानले यांचा समावेश आहे.