मुक्तपीठ टीम
भारतीय प्रादेशिक सेनेत ‘प्रादेशिक सेना अधिकारी’ म्हणजेच टेरिटोरियल आर्मी ऑफिसर या पदावर एकूण १३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय प्रादेशिक सेनेच्या अधिकृत वेबसाइट https://territorialarmy.in/ वरून माहिती मिळवू शकता.