मुक्तपीठ टीम
रविवारी कोरोनाचे ६ हजार ४९३ नवे रुग्ण नोंदवले गेले. पण ही संख्या फक्त आजची नाही. तर शनिवारी आय सी एम आर पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संपूर्ण दैनंदिन माहिती मिळण्यास अडचण झाली होती. ती संख्या आजच्या रुग्णसंख्येत समाविष्ट झाली आहे. आज राज्यात ६ हजार २१३ रुग्ण बरे झाले.
- आज राज्यात ६४९३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६२१३ रुग्ण बरे,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,९०,१५३ करोना बाधित रुग्ण बरे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१८,५२,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,६२,६६६ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २४६०८ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.५ आणि बी ए. ४ व्हेरीयंटचे आणखी ५ रुग्ण
- बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार बीए.५ व्हेरीयंटचे ३ आणि बी ए.४ चे २ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई येथील आहेत.
- हे सर्व नमुने १० ते २० जून २०२२ या कालावधीतील आहेत.
- या रुग्णांचा वयोगट :
- ते १८ वर्षे – १
- ते ५० वर्षे – ३
- ५० वर्षांपेक्षा जास्त – १
- या मध्ये ३ पुरुष तर २ स्त्रिया आहेत.
- यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ३३,नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ६४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,६२,६६६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका २७७१
- ठाणे ११०
- ठाणे मनपा ५०७
- नवी मुंबई मनपा ४७६
- कल्याण डोंबवली मनपा १३९
- उल्हासनगर मनपा २७
- भिवंडी निजामपूर मनपा ७
- मीरा भाईंदर मनपा १३३
- पालघर २३
- वसईविरार मनपा १३४
- रायगड २३८
- पनवेल मनपा २३९
- ठाणे मंडळ एकूण ४८०४
- नाशिक १८
- नाशिक मनपा ६९
- मालेगाव मनपा ५
- अहमदनगर २०
- अहमदनगर मनपा ५
- धुळे ५
- धुळे मनपा १
- जळगाव १५
- जळगाव मनपा ६
- नंदूरबार ६
- नाशिक मंडळ एकूण १५०
- पुणे ९९
- पुणे मनपा ६७२
- पिंपरी चिंचवड मनपा २२५
- सोलापूर २०
- सोलापूर मनपा १८
- सातारा २६
- पुणे मंडळ एकूण १०६०
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा ९
- सांगली १४
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५
- सिंधुदुर्ग २५
- रत्नागिरी ३६
- कोल्हापूर मंडळ एकूण १०२
- औरंगाबाद ८
- औरंगाबाद मनपा ३०
- जालना ११
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ५२
- लातूर ३६
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद १३
- बीड ४
- नांदेड २
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ६३
- अकोला ७
- अकोला मनपा १६
- अमरावती ६
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ १७
- बुलढाणा ११
- वाशिम १८
- अकोला मंडळ एकूण ७९
- नागपूर ५८
- नागपूर मनपा ८०
- वर्धा ५
- भंडारा १०
- गोंदिया ४
- चंद्रपूर १४
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली १०
- नागपूर एकूण १८३
एकूण ६४९३
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या रविवार, २६ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.