मुक्तपीठ टीम
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने २४ जून २०२२ रोजी चित्रपट, टीव्ही, रिअॅलिटी शो, ओटीटी प्लॅटफॉर्म, मनोरंजन उद्योगात मुलांसाठी सहभाग नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये मनोरंजनाच्या नावाखाली मुलांचे होणारे शोषण होणार नाही. या मार्गदर्शक तत्त्वाच्या मसुद्यात बालकलाकारांचे हक्क, त्यांच्या उल्लंघनाबाबत पूर्णपणे स्पष्टीकरण देण्यात आले आहे आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
बालकलाकारांना स्वाभिमानाने काम करण्याचा अधिकार
- प्रत्येक बालकलाकाराला स्वाभिमानाने काम करण्याचा आणि संबंधित निर्णयांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असेल.
- त्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल.त्यांना असा कोणताही रोल जबरदस्ती करण्यास भाग पाडले जाणार नाही ज्यामुळे त्यांना लाजिरवाणे वाटेल.
- रिअॅलिटी शोमधील जज अनेकदा सहभागींशी अतिशय उद्धटपणे वागतात.अशा प्रकारचा व्यवहार चूकीचा असेल.
- नवीन मार्गदर्शक तत्त्वात स्पष्टपणे प्रतिबंधित केले आहे. त्यात म्हटले आहे की कोणत्याही प्रकारची नग्नता किंवा अश्लील दृश्ये त्यांच्याकडून करून घेतली जावू नयेत.
मुलांसाठी सुरक्षित वातावरण असणे आवश्यक
- आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, मुलांसाठी वातावरण योग्य आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.
- सुरक्षित अन्न आणि पाणी तसेच विश्रांतीच्या मुलांसाठी खोल्या या सर्वाची जबाबदारी कार्यक्रम-निर्मात्याची असते.
- जर बाल कलाकार ६ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर त्याच्या सोबत कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे.
- त्याचप्रमाणे, ६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसह, पालक किंवा त्यांच्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती आवश्यक असेल.
- बालकलाकारांना दिवसातून फक्त एकाच शिफ्टमध्ये काम करता येते. तसेच, त्यांना दर तीन तासांनी ब्रेक द्यावा लागेल.
याव्यतिरिक्त, बाल न्याय कायदा, २०१५ च्या कलम ७७ चे पालन करून, मुलांना मद्यपान, धूम्रपान करण्यास मनाई आहे.