डॉ. जितेंद्र आव्हाड / व्हा अभिव्यक्त!
छत्रपती राजश्री शाहु महाराजांनी इथल्या, स्पृश्य, अस्पृश्य समाजासाठी केलेले कार्य म्हणजे त्यावेळी समाजातील पसरलेल्या चातुर्वण्य व्यवस्थेवर केलेले प्रहारच होते!
जातीव्यवस्था ही इथल्या चातुरवर्णव्यवस्थेची सर्वात मोठी ताकत होती. आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती.अशावेळी हा भेद मिटविण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी एका अश्पृश्य असलेल्या “गंगाधर कांबळे” नावाच्या व्यक्तीकडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वतः त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. हा त्या मागचा राजश्री शाहू महाराजांचा उद्देश होता. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे हे चातुर्वर्णव्यवस्थे, जातिव्यस्थे विरूद्ध राजश्री शाहूमहाराज यांनी उचलेले सर्वात मोठे साहसी पाऊल होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा शिष्यवृत्तीवर शिकण्यासाठी परदेशात गेले होते तेंव्हा त्यांना शिष्यवृत्ती संपल्यामुळे भारतात परत यावे लागले. हि गोष्ट जेंव्हा राजश्री शाहू महाराज यांना समजली तेंव्हा ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्ता शोधत मुंबईच्या चाळीत त्यांना भेटायला गेले आणि पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत केली होती. त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले आणि माणगाव येथील बहिष्कृत परिषदेत शोषित मागासवर्गीय लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात नवा नेता मिळाल्याची घोषणा स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केली .
महाराजांच्या निधना नंतर बाबासाहेब स्वतः अस्वस्थ होते आर्थिक संकट त्यांना सतावत होते आणि तेव्हड्यात एक इसम घरी आला आणि म्हणाला महाराजानी तुमच्या पुढच्या आयुष्या साठी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे
पंचम किंग जॉर्ज यांच्या राज्याभिषेक समारंभाला शाहू महाराज उपस्थित जगभरातील सर्व राजे महाराजे ह्या सोहळ्याला उपस्थित होते जगभरच्या राजा महाराजांनी पंचम किंग जॉर्जना मुजरा केला पण शाहू महाराजांनी न वाकता हात मिळवून शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले आपण दोघे राजे आहोत त्यात भेदभाव नको. म्हणजे भेदभाव त्यांना मान्यच नव्हता आणि म्हणून ते आपल्या संस्थानात भेदभाव संपवू शकले
बहुजनांना मिळालेला आशीर्वाद राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
(डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)