मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील शिवसेनेचे संकट संपण्याचे नाव घेत नाही आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले असतानाच काँग्रेसचे दोन दिग्गज नेते एकमेकांना भिडल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्याचा सल्ला दिला तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रमोद कृष्णम यांचं वक्तव्य ना पक्षाचं मत आहे ना आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहे, असे म्हटले. यावरुन आचार्य प्रमोद यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास एका क्षणाचाही विलंब न करण्याचा प्रमोद कृष्णम यांचा सल्ला!
सत्ता को “ठोकर”
पे मारने वाले स्व.बाला साहब ठाकरे की विरासत का सम्मान करते हुए @OfficeofUT जी को मराठा “गौरव” की रक्षा करने हेतु नैतिक मूल्यों का निर्वहन करते हुए “मुख्यमंत्री” के पद को त्यागने में एक पल का “विलम्ब” भी नहीं करना चाहिये. #MaharashtraCrisis— Acharya Pramod (@AcharyaPramodk) June 22, 2022
- गुरुवारी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उद्धव ठाकरेंना तात्काळ राजीनामा देण्याचा सल्ला दिल्याने संपूर्ण वादाला सुरुवात झाली.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांनी हा सल्ला दिला. - त्यांनी लिहिले, बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचा आदर राखत उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी नैतिक मूल्यांचं पालन करताना मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्यास क्षणाचाही विलंब करू नये, असे नमूद केलंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद!
ना तो यह कांग्रेस पार्टी के विचार हैं, ना ही आचार्य प्रमोद कृष्णम कांग्रेस के अधिकृत प्रवक्ता हैं। https://t.co/MGrBqPibeQ
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 22, 2022
- प्रमोद कृष्णम यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
- रमेश म्हणाले, कृष्णम याचं वक्तव्य ना काँग्रेस पक्षाचं मत आहे, ना आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहेत.
यावर प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिलीय. - ते म्हणाले, सत्ता तात्पुरती असते. मात्र, मी कायम आहे. तरीही तुम्हाला काही अडचण असेल, तर ‘जयराम’! ज्यांनी सत्तेला कधीच महत्त्व दिलं नाही, त्यांचा आदर केला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.