मुक्तपीठ टीम
क्लाउडफ्लेअर या सीडीएनच्या शटडाउनमुळे जगातील अनेक वेबसाइट्स ठप्प झाल्याच्या घटना आज घडली. डिस्कॉर्ड, कॅनव्हा, स्ट्रीमयार्ड आणि नथिंग सारख्या साइट्स आज तासभर बंद होत्या. क्लाउडफ्लेअर हे एक कंटेंट डिलिव्हरी करणारे नेटवर्क आहे. नेमकं हे कंटेट डिलिव्हरी नेटवर्क म्हणजे CDN असतं तरी काय, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
कंटेंट डिलीवरी नेटवर्क म्हणजे काय?
- कंटेंट डिलीवरी नेटवर्कला कंटेंट डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क देखील म्हणतात.
- वेबसाइटला त्याच्या नेटवर्कद्वारे कनेक्ट करता येते. सहसा हे नेटवर्क अनेक सर्व्हरला एकत्र जोडते.
- सीडीएनचे मुख्य कार्य म्हणजे यूजरया जवळच्या नेटवर्कशी कनेक्ट होणे आणि त्याच्यापर्यंत कंटेंट पोहोचवणे.
- वेबसाइटचा वेग देखील कंटेंट डिलीवरी नेटवर्कवर अवलंबून असतो.
- कंटेंट डिलीवरी नेटवर्क अशा प्रकारे डिझाइन केले आहे की यूजर्सना किमान लेटन्सी मिळेल. लेटन्सी म्हणजे ज्या वेळेत तुम्ही नेटवर्कशी कनेक्ट केले आहे.
क्लाउडफ्लेअर डाऊनमुळे कोणत्या वेबसाइट्स ठप्प होत्या?
- क्लाउडफ्लेअरच्या डाऊन झाल्यानंतर बर्याच वेबसाइट्सना “500 Internal Server Error” असा मेसेज येत होते.
- क्लाउडफ्लेअरच्या समस्यांनंतर डिस्कॉर्ड, झेरोधा, शॉपीफाई, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, ट्विटर, कॅनव्हा आणि काही मोबाइल गेम्स देखील ठप्प झाले होते.
- या आउटेजमध्ये यूडेमाय, स्प्लंक, क्वॉरा, क्रंचीरोल तसेच व्हॅझिर्क्स, कॉईनबेस, एफटीएक्स, बीटफिनेक्स आणि ओकेएक्स सारख्या साइट्स थांबवण्यात आल्या.
आता सर्व सुरळीत!
क्लाउडफ्लेअरने ट्विट करून या आउटेजची माहितीही दिली आहे, मात्र आता आउटेज निश्चित करण्यात आला आहे आणि सर्व वेबसाइट्स चांगल्या प्रकारे काम करत आहेत.