मुक्तपीठ टीम
राजस्थानी समाजात एकीकडे महाराणा प्रतापांसारखे महाप्रतापी योद्धे झाले तर दुसरीकडे भामाशांसारखे महादानी आणि मीराबाईंसारखे संत निर्माण झाले. युद्धभूमीवर आघाडीवर असंणारा राजस्थानी समाज दान व पुण्य कार्यातही अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.
जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजभवन येथे मुंबईच्या राजस्थानी समाजातील डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, व्यापारी व समाजसेवकांना करोना काळातील सेवाकार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कोरोना वीर सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र गुप्ता व उद्योजक धनराज अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
आपण समाजाकडून काही ना काही घेत असतो त्यामुळे आपण समाजाला देखील देणे लागतो ही भावना राजस्थानी समाजात विशेषत्वाने पाहायला मिळते. राजस्थानी समाज उत्तराखंड, नेपाळ पासून तर अनेक देशात पसरला आहे. या सर्व ठिकाणी समाजाने तळे, विहिरी, शाळा व धर्मशाळा बांधून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मुंबईसारख्या महानगरात देखील राजस्थानी समाजाने उद्यमशीलतेमुळे स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते मीरा भाईंदरचे वरिष्ठ स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. शिवभगवान अग्रवाल, वरिष्ठ समाज समाजसेवी – किशनलाल मोर, शरद गोयनका, शल्य चिकित्सक डॉ. निरंजन अग्रवाल, शंकर मित्तल, नगरसेवक तसेच नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. सुशील अग्रवाल, श्रीमती शानू जोरावर सिंह गोहिल, उद्योगपती नंदकिशोर अग्रवाल, बाल रोग विशेषज्ञ डॉ. राजीव अग्रवाल, समाजसेवी रामवतार भूतड़ा, विजय डोकानियां, सीए नारायण तोष्णीवाल, सीए विष्णु अग्रवाल, उद्योगपती राजकुमार केडिया, उद्योगपती मनोज अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, मंगला सुरेश पुरोहित, नटवर डागा, प्रवीण मुकीम, दिनेश अग्रवाल, पवनकुमार शर्मा, जितेन्द्र गुप्ता, सीए मनोज खेमका, सुशील पोद्दार व जितेन्द्र कुमार कोठारी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.