मुक्तपीठ टीम
विमा हे आर्थिक संरक्षणाचे एक चांगले आधुनिक माध्यम मानले जाते. कारण विमाधारक व्यक्तीला पॉलिसीत नमूद नुकसानाच्या भरपाईची विम्यातून हमी मिळते. जीवन उमंग पॉलिसी म्हणजे ही एलआयसीची आयुष्यभराची मनी बॅक पॉलिसी आहे. जीवन आनंद योजनेव्यतिरिक्त, जीवन उमंग ही एकमेव पॉलिसी आहे जी १०० वर्षांसाठी विमा संरक्षण देते. त्यामुळे जीवन उमंग पॉलिसीबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे…
काय आहे जीवन उमंग पॉलिसी?
- जीवन उमंग पॉलिसी ही एलआयसीची हमी दिलेली परतावा योजना आहे, ज्यामध्ये आयुष्यभरासाठी विम्याच्या रकमेच्या ८ टक्के रक्कम मिळते.
- जिथे बँका आणि इतर वित्तीय संस्था सातत्याने व्याजदर कमी करत आहेत, त्याचवेळी जीवन उमंगकडून ८ टक्के परतावा मिळेल, तोही वयाच्या १०० वर्षापर्यंत मिळतो.
सोप्या भाषेत जीवन उमंग पॉलिसी म्हणजे, आज तुमचे वय ३० वर्षे आहे आणि तुम्ही १० लाख विम्याची जीवन उमंग पॉलिसी घेतली आहे आणि समजा, तुम्ही प्रीमियम भरण्याची मुदत २० वर्षे निवडली आहे. तुम्ही ५० वर्षांचे झाल्यावर तुमचा प्रीमियम भरणे बंद होईल आणि तुम्हाला पैसे मिळणे सुरू होईल.
तुम्हाला विम्याच्या रकमेच्या ८% रक्कम उपलब्ध असेल, अशा प्रकारे आयुष्यभर प्रतिवर्ष ८० हजार रूपये मिळणे सुरू होईल आणि तुमचे वय १०० वर्षे होईपर्यंत ते मिळेल.जीवन उमंग पॉलिसीमध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्योरिटी मिळते
जीवन उमंग पॉलिसी एक पेन्शन योजना
- जीवन उमंग पॉलिसी पेन्शन योजनेचा एक चांगला पर्याय आहे.
- आजच्या काळात, क्वचितच कोणी वयाची १०० वर्षे पूर्ण करतो आणि त्यांना मॅच्योरिटी मिळते.
- परंतु जोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत दरवर्षी चांगली रक्कम मिळत राहते आणि नॉन-लाइफच्या बाबतीत, नॉमिनीला विम्याची रक्कम मिळेल. अशा प्रकारे ही एक पेन्शन योजनाच आहे.
एलआयसी जीवन उमंग पॉलिसी पात्रता
- आता या योजनेत सामील होण्याची पात्रता काय आहे ते जाणून घेऊ.
- जीवन उमंग पॉलिसीमध्ये सामील होण्याचे किमान ३ महिन्यापासून ते कमाल वय ५५ वर्षे आहे.
- यामध्ये किमान विमा रक्कम १० लाख रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम नाही. अशाप्रकारे, जीवन उमंग पॉलिसी पेन्शनसाठी एक चांगला पर्याय ठरेल.