Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेगासस झालं, आता हर्मिट! राजकीय नेते, कॉर्पोरेट, पत्रकार यांच्या मोबाइल हेरगिरीसाठी वापर!

June 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Spyware Hermit

मुक्तपीठ टीम

इस्रायली पेगासस स्पायवेअर प्रकरण अद्याप संपलेले नसताना आणखी एक नवीन मोबाइल फोन स्पायवेअर उघडकीस आलं आहे. ‘हर्मिट’असे या धोकादायक स्पायवेअरचे नाव आहे. हर्मिट या स्पायवेअरचा वापर जगभरातील काही देशांचे सरकार उच्च प्रोफाइल अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी करत असल्याचे पुढे आले आहे. राजकारणी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांशी संबंधित लोक आणि व्यापारी या स्पायवेअरचे लक्ष्य आहेत.

या देशांमध्ये हर्मिट सक्रीय!

  • लुकआउट थ्रेट लॅब नावाच्या या कंपनीच्या संशोझनानुसार, कझाकस्तानमध्ये प्रथमच या अभ्यासात त्याचा वापर झाल्याचे आढळून आले.
  • कझाकस्तानमध्ये सरकारी धोरणांविरोधात लोक रस्त्यावर उतरले.
  • हे आंदोलन कझाक सरकारने जबरदस्तीने दडपले होते.
  • तेव्हापासून, कझाक सरकार लोकांची हेरगिरी करण्यासाठी हर्मिट स्पायवेअर वापरत आहे.
  • याशिवाय हे अँड्रॉइड आधारित सॉफ्टवेअर सीरिया आणि इटलीमधील युजर्सच्या फोनमध्येही दिसले.

असे करते कार्य

  • लुकआउट कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की हर्मिट स्पायवेअर हे मॉड्युलर स्पायवेअर आहे, जे डाउनलोड केल्यानंतर आपले काम सुरू करते.
  • हे सॉफ्टवेअर एसएमएसद्वारे मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले जाते. हे फिशिंग हल्ल्यासारखे आहे.
  • हे हर्मिट डाऊनलोड झाल्यानंतर लगेच काम करण्यास सुरवात करते.
  • हे Android फोनवर इंस्टॉल झाले की फोनमधील सर्व अॅक्टीव्हिटी वारंवार तपासत राहते.
  • हे ऑडिओ रेकॉर्ड करू शकते, कॉल करू शकते आणि ते पुनर्निर्देशित करू शकते.
  • हे कॉल लॉग, डिव्हाइस लोकेशन आणि एसएमएस डेटा चोरू शकते.
  • त्याची iOS आवृत्तीही समोर आली आहे. म्हणजेच आयफोनमध्येही घुसू शकतो, पण त्याचे नमुने सापडलेले नाहीत.

इटालियन कंपनीच्या हर्मिट स्पायवेअरचे परदेशी ग्राहक

  • हर्मिट स्पायवेअर इटलीमधील आरसीएस लॅब आणि ताईकेलाब एसआरएल यांनी विकसित केले आहे, असे संशोधकाने त्याच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
  • इटालियन सरकारने २०१९ मध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेसाठी याचा वापर केला.
  • RCS लॅब जवळपास ३० वर्षांपासून सक्रिय आहे आणि पेगासस बनवणारी इस्रायली फर्म NSO ग्रुप आणि फिनफिशरचा निर्माता गामा ग्रुप यांच्या कार्यक्षेत्रातच कार्यरत आहे.
  • RCS लॅबचे पाकिस्तान, चिली, मंगोलिया, बांगलादेश, व्हिएतनाम, म्यानमार आणि तुर्कमेनिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर संस्थांशी संबंध आहेत.

Tags: Hermit SpywareItalypegasus spywareइटलीपेगासस स्पायवेअरहर्मिट स्पायवेअर
Previous Post

अग्निपथ आगडोंब : अग्निवीरांना सेवापश्चात लाभासाठी त्यांच्या पगारातूनच होणार कपात!

Next Post

अग्निवीरांसाठी अनेक घोषणा! मात्र, सध्या निवृत्ती सैनिकांना किती रोजगार देते सरकार?

Next Post
Agnipath

अग्निवीरांसाठी अनेक घोषणा! मात्र, सध्या निवृत्ती सैनिकांना किती रोजगार देते सरकार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!