मुक्तपीठ टीम
कर्मचारी राज्य विमा महामंडळात असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या ४९१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- एमडी/ डीएनबी/ एमएस/ एमडीएस/ डॉक्टरेट पदवी
- ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
प्रादेशिक संचालक, ईएसआय कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, लक्ष्मी नारायण मंदिराजवळ सेक्टर-16, फरीदाबाद-१२१००२, हरियाणा
अधिक माहितीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://www.esic.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.