मुक्तपीठ टीम
“अन्न हे पूर्णब्रह्म” मानले जाणाऱ्या भारतात अन्नपदार्थांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. युनायटेड नेशन्स आणि ऑर्गनायझेशन फॉर अॅग्रिकल्चरच्या अंदाजानुसार, जगात अन्नपदार्थ्यांच्या नासाडीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे आहे. भारतात लग्न समारंभ आणि घरगुती कार्यक्रमात अन्नाची मोठी नासाडी होते. भारतात अन्न नासाडी किती प्रचंड ते भारतात दरवर्षी सुमारे २१०० कोटी किलो गहू वाया जातो, त्यावरूनच उघड होतं. भारतात वाया जाणाऱ्या गव्हाएवढा गहू , तेवढं ऑस्ट्रेलियात दरवर्षी गव्हाचे उत्पादन होते. त्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचं पोट भरलं जातं.
अन्न टाकून माजण्याच्या अपप्रवृत्तीवर बोट ठेवणारा अहवाल…
- अन्नाची नासाडी होताना ते तयार करण्यासाठी लागणार्या पाणी, जमीन, खनिजे अशा सर्व स्रोतांचा अपव्यय होतो.
- युरोप आणि उत्तर अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती वर्षाला ९५ ते ११५ किलो अन्न वाया घालवते.
- आफ्रिका आणि दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये हे दर वर्षी ६ ते ११ किलो आहे.
या देशांमध्ये सर्वाधिक अन्नाची नासाडी
- चीन ९.१ कोटी टन
- भारत ६.८ कोटी टन
- नायजेरिया ३.७ कोटी टन
- इंडोनेशिया २.० कोटी टन
- अमेरिका १.९ कोटी टन
मुंबईत दररोज सुमारे ६९ लाख किलो खाद्यपदार्थ कचऱ्यात!
- दरवर्षी सुमारे २१०० कोटी किलो गहू भारतात वाया जातात.
- ऑस्ट्रेलियात दरवर्षी तेवढ्याच गव्हाचे उत्पादन होते. त्यांच्या लोकसंख्येचं पोट भरतं.
- दरवर्षी ९० हजार कोटी रुपयांचे ६.८ कोटी टन अन्न वाया जाते, जे प्रति व्यक्ती सरासरी ५० किलो इतके आहे. मुंबईत दररोज सुमारे ६९ लाख किलो खाद्यपदार्थ कचऱ्यात फेकले जातात.
- एवढ्या अन्नामुळे दररोज निम्म्या मुंबईकरांचे पोट भरू शकते.
- या खर्चात शीतगृह आणि अन्नसाखळीची व्यवस्था केली तर देशातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही.
हे विदारक वास्तव समजून घ्या…
- जगातील १७% लोकसंख्या दररोज उपाशी झोपते.
- खराब खाण्यापिण्यामुळे २० लाख लोक आजारी पडतात.
- खराब अन्न साखळी ३३% हरितगृह वायू उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.
- जगातील २८% शेतीयोग्य जमीन वाया जातेय.
- जगातील ५ मोठ्या नद्यांचे पाणी खराब अन्न तयार करण्यात वाया जात आहे.
- २०५० पर्यंत आजच्यापेक्षा तिप्पट लोक उपाशी राहतील