Sunday, March 15, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंत्रिमंडळ उपसमितीकडून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक कामाची पाहणी

June 16, 2022
in सरकारी बातम्या
0
indumill inspection

मुक्तपीठ टीम

मुंबईतील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे सनियंत्रण व काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आदी मान्यवरांनी आज इंदूमिल स्मारक कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, त्याच्या पादपीठाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असून, पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती देखील लवकरच अंतिम करण्यात येणार आहे, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी एकूण कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या प्रतिकृतीची निर्मिती सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रतिकृतीची मंत्रिमंडळाने नेमलेल्या उपसमितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन नुकतीच पाहणी केली होती व त्या प्रतिकृती मध्ये काही बदल सुचवले होते.

त्यानुसार नवीन बदलांसह शिल्पकार अनिल सुतार यांनी प्रतिकृतीबाबतचे सादरीकरण केले. ही प्रतिकृती लवकरच अंतिम करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, शिल्पकार अनिल राम सुतार, समीर अनिल सुतार, संजय पाटील, आर्किटेक्ट शशी प्रभू, इतिहासतज्ज्ञ डॉ. आर मालाणी, सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट चे प्रा. विश्वनाथ सहारे आदी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने त्याला पूरक असा दर्जा सांभाळून काटेकोरपणे यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, हे स्मारक भविष्यात जगभरात ओळखले जावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, विषयतज्ज्ञ, सर्व पक्षीय नेते यांसह विविध मान्यवरांच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

दरम्यान समुद्र किनारीचे वातावरण, वातावरणातील होणारे बदल, पावसाळ्यात कामाची गती आदी बाबी विचारात घेवून दैनंदिन कामांचा तक्ता बनवून त्यावर अंमल करावा, अशा सूचना यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.


Tags: InduMillmumbaiइंदूमिलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकमंत्रिमंडळ उपसमितीमुंबई
Previous Post

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यास शासन सकारात्मक – बाळासाहेब पाटील

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक- डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post
Dr Neelam Gorhe

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक- डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!