मुक्तपीठ टीम
रेनॉ ही एक प्रसिद्ध कार कंपनी आहे जी नेहमी नवीन नवीन ऑफर घेऊन येते. यावेळी रेनॉ कार कंपनी आता त्यांच्या निवडक कार्सवर ८४,००० रूपये बचत करण्याची संधी देत आहे. रेनॉच्या या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे. जून अखेरपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या कोणत्या कारवर किती सवलत…
रेनॉ क्विडच्या कोणत्या व्हेरियंटवर किती सूट…
- रेनॉ क्विड कार रेनॉची सर्वात छोटी कार आहे.
- या कारमध्ये ८००cc आणि १०००cc इंजिन उपलब्ध आहेत.
- कंपनी ५,००० रुपयांची रोख सूट, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस
- तर ८००cc आणि १,०००cc व्हेरियंटवर १०,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे.
- ही कार विकत घेतल्यावर, ३७,००० रुपयांचे लॉयल्टी फायदे आणि एक्सचेंजचे फायदे आहेत.
- रिलिव्ह स्क्रॅपेज प्रोग्राममधून १०,०० रूपयापर्यंत लाभ मिळेल.
- रेनॉ क्विड ही एंट्री लेव्हल कार आहे, या कारची किंमत ३.१८ लाखपासून सुरू आहे.
रेनॉ किगरवर सर्व ऑफर लागू
- कंपनीने रेनॉ किगरच्या सर्व व्हेरियंटवर ऑफर जाहीर केल्या आहेत. -कंपनीने या कारवर १०,०० रुपयांची कॉर्पोरेट सूट, १०,००० रुपयांपर्यंतच्या थेट स्क्रॅपेज प्रोग्राममधून एक्सचेंज फायदे आणि ५५,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील देऊ करत आहे.
- कंपनी या रेनॉ कारवर ५,००० रुपयांची ग्रामीण ऑफर देखील देत आहे
- ग्रामीण ऑफर फक्त शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना लागू असेल.
- या कारची सुरुवातीची किंमत ५,९९,९०० रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.
- कंपनीने रेनॉ ट्रायबर वर १०,००० रूपयापर्यंत कॉर्पोरेट सूट, २०,००० रूपयापर्यंतचा एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज प्रोग्राममधून १०,००० पर्यंतची सूट तसेच ४४,००० पर्यंतचा लॉयल्टी बोनस देत आहे.
- या कारची सुरुवातीची किंमत ५.३० लाख रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.