काजोल सरगर ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील महादेव सरगर एक पानटपरी चालवतात तर आई छोटेसे हॉटेल चालवते. अत्यंत गरिबीतून कष्टातून काजोलने गेली तीन वर्षे वेटलिफ्टिंगसाठी तयारी सुरू केली होती. सांगलीतील दिग्विजय इन्स्टिट्यूटमध्ये काजोल आपले कोच मयूर सिंहासने यांचेकडे प्रशिक्षण घेत आहे. मोठ्या जिद्दीने तिने प्रशिक्षण घेत हरियाणा येथे 5 जून रोजी पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने 40 किलो वजनी गटात सहभाग घेतला. या वजनी गटात एकूण 13 खेळाडू स्पर्धक सहभागी होते या सर्वांना मागे टाकत काजोलने तीन लिफ्ट क्लिअर करत सुवर्णपदक पटकावले आहे.