मुक्तपीठ टीम
डीआरडीओ आरएसीत शास्त्रज्ञ एफ या पदासाठी ०३ जागा, शास्त्रज्ञ ई या पदासाठी ०६ जागा, शास्त्रज्ञ डी या पदासाठी १५ जागा, शास्त्रज्ञ सी या पदासाठी ३४ जागा अशा एकूण ५८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
- अर्ज करणारा उमेदवार, बी.ई/ बी.टेक/ एम.एससी
- ०३/०७/१०/१३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५, ४५ किंवा ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe