मुक्तपीठ टीम
आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नईत लिलावप्रक्रिया पार पडली. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला २० लाख रुपयांत करारबद्ध केलं आहे. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने विकत घेतल्यानंतर त्याच्यावर आणि टीमवर नेटकऱ्यांनी टीकेचा वर्षाव केला. सोशल मीडियावर ‘वडिलांच्या कर्तुत्वामुळे अर्जुनला संघाने विकत घेतले’ असल्याची टीका अनेकांनी केली. अर्जुन तेंडुलकर लिलावाच्या मैदानात उतरण्यापूर्वीच सोशल मीडियावर ‘घराणेशाही’वरुन ट्रोलिंग सुरु झाली होती. आता मुंबई इंडियन्सचे कोच महेला जयवर्धनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“सचिनचा मुलगा हा टॅग त्याच्यावर कायम लावला जाईल. पण आम्ही हा निर्णय त्याच्या कौशल्यांच्या आधारे घेतला. त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे अर्जून एक गोलंदाज आहे ना की वडिलांप्रमाणे फलंदाज” असे महेला जयवर्धने यांनी स्पष्ट केले.
“अर्जुनसाठी हा काळ शिकण्याचा आहे. त्याने नुकतीच मुंबईकडून खेळण्यास सुरुवात केली आहे आणि आता फ्रॅंचायझी संघात आहे. अजून तरी तो युवा खेळाडू आहे. हळू हळू शिकेल आणि त्याचा खेळ सुधारेल. अर्जुनला थोडा वेळा दिला पाहिजे, तसेच त्याच्यावर जास्त दबाव आणला जाणार नाही अशी अशा व्यक्त करतो. आमचा प्रयत्न त्याचा खेळ आणखीन सुधारणे हा असेल”, असे जयवर्धन यांनी म्हटले.
अर्जुन हा अष्टपैलू खेळाडू आहे जो वेगवान गोलंदाजीद्वारे चांगली फलंदाजी करतो. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्पर्धेत त्याने तीन विकेट्ससह तुफानी अर्धशतक झळकावले. ३१ चेंडूत त्यांनी ७१ धावांच्या केल्या, त्यात त्याने ५ षटकार लगावले.
‘मुंबई इंडियन्स’ने या खेळाडूंना घेतले विकत
- नाथन कूल्टर-नाइल: पाच कोटी रुपये
- अॅडम मिल्नेः ३.२० कोटी रुपये
- पियूष चावलाः २.४० कोटी रुपये
- जेम्स नीशामः ५० लाख रुपये
- युद्धवीर चरकः २० लाख रुपये
- मार्को जेनसनः २० लाख रुपये
- अर्जुन तेंदुलकरः २० लाख रुपये