मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २९२२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १३९२ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४४,९०५करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज एक करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१२,७८,८४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,०७,६३१(०९.७३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १४८५८ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आणखी एका रुग्णामध्ये बी ए.५ व्हेरीयंट –
पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडील जनुकीय क्रमानिर्धारणाच्या ताज्याअहवालानुसार, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) या प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत पुणे शहरातील एका ३७ वर्षीय पुरुषामध्ये बी.ए.५ हा विषाणू व्हेरियंट आढळून आला आहे. हा रुग्ण २ जून २०२२ रोजी कोविड बाधित आढळला. या रुग्णाला आजाराची सौम्य लक्षणे होती. सदर रुग्ण घरगुती विलागीकरणात बरा झाला. हा रुग्ण २१ मे रोजी इंग्लंड वरून आलेला आहे आणि त्याने कोवीशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २९२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,०७,६३१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १७४५
- ठाणे ३०
- ठाणे मनपा १८५
- नवी मुंबई मनपा २३८
- कल्याण डोंबवली मनपा ६१
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ५४
- पालघर १०
- वसईविरार मनपा ९०
- रायगड ६२
- पनवेल मनपा ७७
- ठाणे मंडळ एकूण २५५५
- नाशिक २
- नाशिक मनपा १५
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४
- अहमदनगर मनपा १
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ५
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण २७
- पुणे ३१
- पुणे मनपा १४०
- पिंपरी चिंचवड मनपा ५१
- सोलापूर ३
- सोलापूर मनपा ०
- सातारा ३
- पुणे मंडळ एकूण २२८
- कोल्हापूर १
- कोल्हापूर मनपा २
- सांगली १
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग ४
- रत्नागिरी ८
- कोल्हापूर मंडळ एकूण १६
- औरंगाबाद २
- औरंगाबाद मनपा २
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४
- लातूर ३
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद १
- बीड २
- नांदेड १
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १३
- अकोला ३
- अकोला मनपा ७
- अमरावती १
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ३
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण १५
- नागपूर २१
- नागपूर मनपा ३६
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ५
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ६४
एकूण २९२२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, ११ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.