मुक्तपीठ टीम
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीसह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. संजय पवार यांच्या पराभवानंतर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. संभाजी छत्रपती, किरीट सोमय्या आणि मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
संभाजीराजे छत्रपतींचा ट्वीटमधून शिवसेनेवर खोचक शब्दांत टोला!!
- राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता.
- मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला.
- संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घालण्यात आली होती.
- पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती हे आता निकालांनंतर स्पष्ट होऊ लागले आहे.
- या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांचे ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे.
- जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत…
-
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगी||
-
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ||
- म्हणजेच, “वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते”.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
ठाकरे यांचे माफिया सरकारचे काउन्ट डाउन सुरु, सोमय्यांचा सूचक इशारा…
- राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.
- धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपाने शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे.
- या विजयानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
- ‘ठाकरे यांचे माफिया सरकारचे काउन्ट डाउन, उलटी गिनती सुरु’ असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.
राज्यसभा निवडणूक… ठाकरे यांचे माफिया सरकार चे काउन्ट डाऊन उलटी गिनती सुरू
Rajyasabha Election Result.. Thackeray Sarkar Mafia Sarkar’s Count Down Started @BJP4India @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 11, 2022
शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम- मनसेचा टोला!!
- राज्यसभेच्या या निकालानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
- “शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ” टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022