मुक्तपीठ टीम
सरकारने ईएसआय आरोग्य विमा योजनेतील लाभार्थ्यांना घराजवळील खाजगी रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या लाभार्थींचे घराच्या १० किमीच्या अंतरामध्ये ईएसआयसी रुग्णालय नाही, ते ईएसआयसी पॅनेलद्वारे घराजवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार नवीन क्षेत्रातही ईएसआय योजनेचा विस्तार झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार नवीन क्षेत्रातही ईएसआय योजनेचा विस्तार झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्या घराजवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पायाभूत सुविधांचा सतत विस्तार करण्यात येत आहे.
कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनेक भागात ईएसआय हॉस्पिटल किंवा फार्मसी उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांना वैद्यकीय सुविधा मिळण्यास अडचण येत आहे. म्हणूनच आता अशा लाभार्थ्यांना ईएसआयसीच्या रूग्णालय उपचार करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी लाभार्थ्यास कोणत्याही ईएसआयसी रुग्णालय किंवा फार्मसीकडून मान्यता घेण्याची गरज भासणार नाही.
अशा भागात ईएसआय लाभार्थ्यांना ईएसआय रूग्णालयात मोफत ओपीडी सेवा मिळविण्यासाठी आधार कार्ड / शासनाने दिलेला ओळखपत्र यासह ईएसआय ई-ओळखपत्र / आरोग्य पासबुक सादर करावे लागेल. अशा लाभार्थीस ओपीडीमध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे पैसे परत घेण्याची सुविधा असेल.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला फार्मसी आणि शाखा कार्यालय किंवा ईएसआयसी क्षेत्रीय कार्यालयात जावे लागेल. लाभार्थीस रूग्णालयात दाखल करणे आवश्यक असते, रूग्णालयात २४ तासांच्या आत ईएसआयच्या अधिकृत अधिकाऱ्याकडून ऑनलाईन मार्फत परवानगी घ्यावी लागेल.