गुन्हे थोड्यात: 1) पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केली, सदर घटना लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज सकाळी हे कृत्य केले असून यावेळी सदर मुलीचे वडिलसुद्धा जखमी झाले आहेत. 2) निफाड तालुक्यात मंगळवारी कारसुळ येथील महाविद्यायीन युवतीचा मृतदेह आढळला होता. दीपिकाचा चुलतभाऊ विक्रम गोपीनाथ ताकाटे याने मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दीपिका व विक्रम यांच्यातील अनैतिक संबंधातूनच हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 3)आर्थिक राजधानी मुंबईतील अमली पदार्थांच्या दलालीविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आता ‘हेरॉइन’, या महागड्या अमली पदार्थांचीही मुंबईत तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. या अमली पदार्थांसह एका आफ्रिकन महिलेला अटक केली आहे. 4) बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबुर परिसरातून अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरु केले होते. आरोपी फकीयानने यूट्यूबवरुन नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 5)विरारमध्येही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीनं एकावर थेट अॅसिड फेकल्यानं आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत एका जीम मालकाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला दाट संशय होता. त्या संशयातूनच पतीनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आलीय.