मुक्तपीठ टीम
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, जिम्
सांघिक विजयानंतर विजयाचा जल्लोश केला जात आहे. अॅथलेटिक्समध्ये मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविल्यानंतर जल्लोषात खेळाडूंसह क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील, अॅथलेटिक्सचे प्रशिक्षक महेश पाटील, जयकुमार टेंबरे, खेळाडू यांच्यासह पालकही सहभागी झाले.
यांनी गाजवले बारावीचे मैदान
दरम्यान खेळासोबतच बारावीच्या निकालातही या खेळाडूंनी आपली छाप पाडली. आयएससी पॅटर्नमधून शिकत असलेल्या आर्यन कदम याला बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्रात ८२ टक्के गुण मिळाले. तर बुधवारी बारावी परीक्षेच्या निकालात आर्यन पाटील (५६ टक्के, पनवेल) आणि सार्थक शेलार (५० टक्के, कोल्हापूर) यांनीही चांगले गुण घेतले. तर आर्यन कदमने ४ बाय १०० रिलेमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्येही सुवर्ण कामगिरी केली आहे. आर्यन पाटीलला उंच उडीत रौप्य मिळाले. सार्थकला रिलेमध्ये सुवर्ण पदक मिळाले. मुलींच्या संघातील वाणिज्य शाखेतील वैष्णवी कातुरे मैदान गाजवताना ६८.३३ टक्के गुण मिळवले. कॉम्प्युटर सायन्सला असलेल्या रिया पाटील ७५.१७ टक्के गुण मिळाले.
अॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांचा सीलसिला सुरूच राहिला. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके आली. खो-खो मध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले.
जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय – अपेक्षा फर्नांडीस हिनेही सुवर्ण पदक जिंकले. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आज एकंदर पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने विजेतेपदक पटकावले.
२०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले.
मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्या संघाने सुवर्ण जिंकले.
पदकतालिका
- हरियाणा – ३३ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य (एकूण ९६)
- महाराष्ट्र – ३० सुवर्ण, २८ रौप्य, २५ कांस्य (एकूण ८३)
- मणिपूर – १३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य (एकूण १८)
(ही आकडेवारी सायंकाळी सात वाजेर्यंतची आहे)