मुक्तपीठ टीम
बॉलीवूडची 90’s ची सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत आहे. सोशल मीडियाद्वारे ही माहिती मिळालेली आहे. बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांनी महिमा चौधरीबद्दल पोस्ट केली आहे, जी इंटरनेटवर व्हायरल होत आहे. महिमा ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिमा लहान केसांमध्ये दिसत आहे.
महिमा चौधरीने परदेस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. या चित्रपटात हिरो म्हणून शाहरुख खान होता आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
View this post on Instagram
अनुपम खेर यांनी त्यांची मैत्रीण आणि अभिनेत्री महिमा चौधरीसाठी एक पोस्ट करत त्याखाली एक मेसेज लिहिला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “महिमा चौधरीचे साहस आणि कर्करोगाची कहाणी: माझ्या ५२५वा चित्रपट द सिग्नेचरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी मी महिमाला एका महिन्यापूर्वी यूएसमधून फोन केला होता. या संवादादरम्यान तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले.”
कॅन्सर फायटर महिमाचे अनुपम खेर यांनी कौतुकही केले
- अनुपम खेर यांनी म्हटले की, तुझ्या जगण्याची पद्धत जगभरातील महिलांना शक्ती देईल.
- ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगण्यासाठी मी तिला मदत करावी अशी तिची इच्छा होती.
- महिमाचे कौतुक करताना अनुपम खेर म्हणतात की, तू माझी हिरो आहेस. मित्रांनो तिला तुमचे प्रेम, शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वाद द्या. ती सेटवर परत आली आहे आणि उडण्यासाठी तयार आहे.
या व्हिडीओमध्ये महिमा चौधरी याबाबत सांगताना खूपच भावूक झाली आहे. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितल्यानंतर ती खूप घाबरली होती, पण तिच्या बहिणीने तिला खूप साथ दिली, असं ती म्हणते. प्रोत्साहनही दिले. व्हिडिओमध्ये अनुपम खेर तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. यावर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत आणि तिला धीर देत आहेत.