मुक्तपीठ टीम
बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (आयबीपीएस) कार्यालयीन सहाय्यक (लिपिक) आणि अधिकारी स्केल १, २ आणि ३ च्या विविध पदांसाठीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठीची भरती प्रक्रिया ०७ जून २०२२ पासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २७ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) – उमेदवारांकडे कोणत्याही विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल-I
ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी) – उमेदवारांकडे कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर) – उमेदवारांकडे कृषी विपणन आणि सहकार, विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर) – उमेदवारांकडे माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल II (कायदा) – उमेदवारांकडे कायदा विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल II (CA) – उमेदवारांकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कडून प्रमाणित सहयोगी (CA) पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल II (IT) – उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
Officer Scale II (General Banking Officer) – उमेदवारांकडे बॅचलर डिग्री. बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
Officer Scale III – उमेदवारांकडे diploma in Banking, Finance, Marketing, Agriculture आणि बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी श्रेणीतील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर इतर सर्वांना ८५० रुपये भरावे लागतील.
अधिक माहितीसाठी आईबीपीएस आरआरबीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वरून माहिती मिळवू शकता.