मुक्तपीठ टीम
राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
रस्त्यावंर विनामास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी गर्दी टाळावी, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टनसिंग ठेवा, सण- समारंभ कमीत कमी संख्येत साजरे करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.