Wednesday, May 21, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘शॉट’ची जाहिरात : अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य की द्वयर्थी स्वैराचार?

June 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
shot

मुक्तपीठ टीम

ट्विटरवर एक जाहिरात वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आक्षेपार्ह भाषा वापरली गेली आहे. शॉट या डिओड्रंटच्या या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ही जाहिरात महिलांविरोधातील गुन्ह्यांना प्रोत्साहन देत असल्याचे ट्विट लोकांनी केले. अशा जाहिराती तयार करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्याचवेळी या जाहिरातीची दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही ती जाहिरात वादग्रस्त मानली आहे. डिओड्रंटच्या जाहिराती तातडीने बंद करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.

ट्विटरवर जोरदार टीका

  • एका युजरने ट्विट केले की जाहिरातीसाठी काही नियम असावेत. डिओड्रंटची जाहिरात खरोखरच घृणास्पद आहे.
  • शॉट या शब्दाचा द्व्यर्थी वापर करत ही जाहिरात तयार करण्यात आली आहे.
  • महिला अत्याचाराला प्रोत्साहन देणारी असल्याने अशा जाहिरातीवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात कोडनुसार चौकशी सुरू आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहिरात कोडनुसार डिओड्रंट जाहिराती बनवणाऱ्या कंपनीची चौकशी सुरू केली आहे.

 

Ministry of Information & Broadcasting has directed a TV channel to take down a highly objectionable misogynist ad promoting a deo called ‘Shot’. Channel has complied.
I&B Ministry has also directed @Google/@YouTube and @Twitter to immediately block this ad from their platforms.1 pic.twitter.com/NjntfSh4ys

— Kanchan Gupta 🇮🇳 (@KanchanGupta) June 4, 2022

दिल्ली महिला आयोगाने कारवाईची मागणी केली

  • दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून या जाहिरातीबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
  • नोटीसमधील जाहिरातींचे विवादास्पद वर्णन करताना, त्या म्हणाल्या की, ते पुरुषत्वाचे सर्वात वाईट चित्रण करतात आणि स्पष्टपणे सामूहिक बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन देतात. यासाठी कंपनीच्या मालकांना जबाबदार धरले पाहिजे.

 

Fuming at cringe worthy ads of the perfume ‘Shot’. They show toxic masculinity in its worst form and clearly promote gang rape culture!The company owners must be held accountable. Have issued notice to Delhi Police and written letter to I&B Minister seeking FIR and strong action. pic.twitter.com/k8n06TB1mQ

— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 4, 2022

मुक्तपीठ भूमिका

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्याचा सन्मानानं जगण्याचा अधिकार हिरावणारं नसावंच.
  • भले त्या जाहिरातीत नंतर शॉट हा शब्द त्या तरुणांनी त्या डिओड्रंटसाठी वापरल्याचं स्पष्ट होत असेल, पण सुरुवातीपासून त्याचा अविर्भाव, त्यांचं बोलणं हे ते वेगळ्या विकृत अर्थानंच शॉट या शब्दाचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट होतं.
  • एखाद्या मॉलमध्ये तसं कुणी बोलणार नाही, तसंच एखाद्याच्या खासगी किंवा हॉटेलच्या रुममध्ये जिथं जोडपं एकांतात आहे, तिथं घुसून कुणी असा शब्द वापरणार नाही.
  • त्यामुळे नंतर जरी स्पष्ट होत असलं, तरी आधी विकृत पद्धतीनं कुतुहल चाळवत जाहिरात चालवण्याचाच जाहिरात चालवण्याचा हेतूच जास्त दिसतो. त्यासाठी बलात्काऱ्यांच्या विकृत मानसिकतेला आपण प्रोत्साहन देत असल्याचं भानही त्यांनी ठेवलेलं नाही.
  • त्यामुळे मंत्रालयाने केलेल्या कारवाईवरच मर्यादित न राहता अशांवर महिला आयोग किंवा अन्य यंत्रणांकडूनही कारवाई झाली, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला मानला जाऊ शकत नाही.

Tags: Freedom of expressionmuktpeethoffensive languageShot advertisingtwitterअभिव्यक्ती स्वातंत्र्यआक्षेपार्ह भाषाट्विटरमुक्तपीठशॉट जाहिरात
Previous Post

जातीनिहाय जनगणना : समजून घ्या राजकारण तापवणाऱ्या जनगणनेविषयी सर्व काही…

Next Post

कोरोना अलर्ट: नेते, सेलिब्रिटी…कोरोनाचा पडतोय सर्वांनाच पुन्हा विळखा!

Next Post
Celebrities

कोरोना अलर्ट: नेते, सेलिब्रिटी...कोरोनाचा पडतोय सर्वांनाच पुन्हा विळखा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!