मुक्तपीठ टीम
भारतात डिजिटायझेशनचा वावर खूप वेगाने वाढत आहे. या डिजिटायझेशनमुळे रोख व्यवहाराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल केले जात आहेत. त्याचबरोबर लोकांचा ताण आणि होणारा त्रासही कमी झाला आहे. याचा लाभ सर्वसामान्यांनाही मिळत आहे. लोकांना बँका सुरू होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. यासोबतच बँकेबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहणाऱ्यांनाही सूट मिळू लागली आहे.
एकमेकांना पैसे पाठवणे आता झाले सोपे
- भारतात आजकाल ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत झपाट्याने वाढत आहे.
- लोक नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, यूपीआयद्वारे अवघ्या काही मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात.
- याशिवाय रोख रकमेची गरज भासल्यास सर्वत्र लावलेल्या एटीएम मशीनमधून लोक पैसे काढू शकतात.
जर, डेबिट कार्ड घरी विसरला असाल तर, टेंशनची गरज नाही कारण, आता देशातील काही बँका अशाही आहेत ज्या एटीएम कार्डविना पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. यासोबतच रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने यूपीएच्या माध्यमातूनही ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आता बँकांच्या एटीएम मशीनमध्ये ही सुविधा सुरू करण्यासाठी यूपीआय पर्याय अपडेट केला जात आहे. एटीएममध्ये यूपीआय पर्याय अपडेट होताच एटीएम मशीनद्वारे रोख पैसे काढण्याची सुविधा सहज मिळू शकेल. यासाठी गुगल पे, पेटीएम, फोनपे इत्यादी अनेक प्रकारचे यूपीआय अॅप्स वापरता येतील. यामुळे लोकांना याचा फायदा होणार आहे.
एटीएम मशीनमधून पैसे काढण्याच्या सोप्या पद्धती
- सर्वप्रथम, एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचा पर्याय निवडा.
- त्यानंतर यूपीआयसह कॅश विथड्रॉवल पर्याय निवडा.
- आता एटीएम मशीनमध्ये क्यूआरकोड दिसेल, तो यूपीआय अॅपद्वारे स्कॅन करा.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पैसे किती काढायचे आहेत ते तिथे लिहा.
- यानंतर स्मार्टफोनमध्ये यूपीआय पिन टाका.