मुक्तपीठ टीम
राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोना वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने मास्क संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. आता बंदिस्त जागेत मास्क वापरण्याचं आवाहन राज्य सरकारने केले आहे. यानुसार शाळा, कॉलेज ऑफिस आणि प्रवासात पुन्हा मास्क वापरावा लागेल. आरोग्य सचिवांलयाकडून प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे.
या ठिकाणी मास्क आवश्यक
- बस, ट्रेन प्रवासात मास्क आवश्यक
- ऑडिटोरियम, चित्रपटगृहात मास्क आवश्यक
- शाळा, कॉलेज ऑफिसमध्ये मास्क घालावा लागणार.
- रुग्णालयात मास्क वापरावा लागणार.
मुंबईत अशी वाढली प्रकरणे
- २५ मे २१८
- २६ मे ३५०
- २७ मे ३५२
- २८ मे ३३०
- २९ मे ३७५
- ३० मे ३१८
- ३१ मे ५०६
- १ जून ७३९
- २ जून ७०४
- ३ जून ७६३
मुंबईत चाचणी वाढवण्यास मनपाचे आदेश!
- मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची गंभीर दखल मुंबई मनपाने घेतली आहे.
- आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मनपा प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले आहे.
- चहल यांनी मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी मुंबईत चाचणी वाढवण्यास सांगितले आहे.
- याशिवाय १२ ते १८ वयोगटातील बालकांना जास्तीत जास्त कोरोना लसीकरण, जम्बो सेंटर पुन्हा सज्ज ठेवणे, खासगी रुग्णालयांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- पावसाळा येत असतानाच कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागासह सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
मुंबईत अचानक कोरोना का वाढू लागला?
- कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीमागे अनेक कारणे असू शकतात.
- कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांची गर्दी वाढली आहे.
- सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भेटताना पूर्वीप्रमाणे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही.
- लोक एकमेकांशी संवाद साधताना मास्कशिवाय दिसतात. त्यामुळे प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे.
- त्याच वेळी, ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंटचा संसर्ग देखील बहुधा कारणीभूत आहे.
- आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितले की, सर्वाधिक सक्रिय प्रकरणे मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहेत.
- मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या एक सुप्त कोरोना लाटेचे संकेत देत आहे, असंही तज्ज्ञांचं मत आहे.