मुक्तपीठ टीम
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच समोर आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत केली आणि आज स्वबळावर या स्तराला ते पोहोचले आहेत. महाराष्ट्रातल्याही एका गावातील दुकानदाराच्या मुलाने नागरी सेवा परीक्षा २०२१ उत्तीर्ण केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालात लातूरच्या उद्गीर तालुक्यातील हुंडरगुळी गावातील रामेश्वर सुधाकर सब्बनवाड याने २०२ वा क्रमांक पटकावला आहे.
- रामेश्वर सुधाकर सब्बनवाड यांचे शालेय शिक्षण लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातूनरामेश्वर सुधाकर सब्बनवाड हे उत्तीर्ण झाले.
- त्यानंतर त्यांनी पुण्यातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली.
- सब्बनवाड यांनी सांगितले की, त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.
- सब्बनवाड यांचे वडील दुकानदार असून आई गृहिणी आहे. यूपीसीनुसार, एकूण ६८५ उमेदवार – ५०८ पुरुष आणि १७७ महिला पात्र ठरले आहेत आणि विविध केंद्रीय सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने त्यांची शिफारस केली आहे.
यापूर्वी आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला होता. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या भरतीद्वारे, आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि गट ए आणि गट बीच्या ७४९ पदे भरली जातील.
भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय विदेश सेवा , रेल्वे गट ए, भारतीय पोस्टल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि इतर सेवा यूपीएससी नागरी सेवांद्वारे आहेत.