योगेश केदार / व्हा अभिव्यक्त!
सरकारने पुन्हा मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसू नये. आता सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जनगणनेसाठी जास्त आग्रही झाल्याने दुर्लक्षित मराठा समाजाचा पुन्हा घात होण्याची शक्यता आहे. ओबीसींची मतदार यादीनुसार जनगणना करत आहातना मग सोबत आधार नंबर सुद्धा लिंक करा. आणि गावपातळीवर संकलित केलेली माहीती ग्रामसभेची मान्यता घेऊन व सदर माहिती तलाठी चावडी ग्रामपंचायत कार्यालयावर प्रकाशित करावी. तरच सत्य समोर येईल. अन्यथा पुन्हा ओबीसींचा आकडा फुगवला जाईल, अशी भीती आहे.
मराठ्यांनो, आपण काही महिन्यांतच ओबीसी आरक्षणामध्ये असणार आहोत. आपण जो २३ मार्च २९९४च्या ‘जी आर’ चां लढा उभा केला होता. त्याला यश येताना दिसत आहे. राज्य सरकारने नवीन आदेश काढले आहेत की मतदार यादीनुसार ओबीसींची संख्या मोजण्याचे आदेश निघाले आहेत. आपण सुरुवातीपासून म्हणतोय, की एकदा कळून जाऊ द्या राज्यात नेमके ओबीसी किती आहेत? मंडल आयोगाने ने त्यांना केवळ १४%च आरक्षण दिले होते, म्हणजे त्याकाळी राज्यात ओबीसींची संख्या केवळ २८%च असली पाहिजे. परंतु २३ मार्च १९९४ला एक जी आर काढून आरक्षणाची मर्यादा १६% नी वाढवून ३०% केली गेली. ती मर्यादा नेमक्या कोणत्या आधारे वाढवली? हे श्वेतपत्रिका काढून जाहीर करा. त्यातून कळून जाईल की आरक्षणाचा घोळ नेमका कसा झाला? मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ५०%च्या आतच आहे. तो फुगलेला आकडा एकदा कमी झाला की आपल्याला आत जायचा रस्ता साफ होईल. चोरीला गेलेले ते आरक्षण पुन्हा आपल्याला मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. मग भलेही जीव गमवावा लागला तरी चालेल. या राज्यकर्त्यांच्या मानगूटावर बसून करून घेणार.
आमची एक अधिकची मागणी असेल की केवळ मतदार यादी प्रमाणे ओबीसींची संख्या मोजू नका. तर सोबत आधार नंबर सुद्धा लिंक करा. कारण खेडे गावातले अनेक लोक शहरात वास्तव्यास असतात. त्यांची संख्या दोन्हीकडे मोजली जाण्याची शक्यता आहे. त्यातून पुन्हा अकडा फुगून दिसेल. म्हणून म्हणतो ओबीसींची संख्या मोजा पण आधार लिंक करूनच. अजित दादा पवार यांनी उद्या आम्हाला भेटण्याची वेळ द्यावी. त्यांच्या साचीवाशी आत्ताच बोलणे झाले. पण त्यांना फारच घाई झालेली दिसते. हा data लवकरात लवकर पाहिजे म्हणून आधार लिंक नको असे ते बोलले. सहा तारखेच्या आत सर्वोच्च न्यायालयात माहिती द्या पण योग्य माहिती द्या. आमच्या मराठ्यांच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या, मग आम्ही चुकीची माहिती डोळ्यादेखत का जाऊ द्यावी? आधार लिंक करूनच माहिती गोळा करा. अन्यथा पुन्हा खंजीर आंदोलन केले जाईल.
(योगेश केदार हे मराठा सेवक म्हणून मराठा आरक्षणासाठी कार्यरत आहेत.)
संपर्क – 9823620666 ट्विटर