मुक्तपीठ टीम
आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी १ हजार ४४ जागा, असिस्टंट मॅनेजर पीजीडीबीएफ या पदासाठी ५०० जागा अशा एकूण १ हजार ५४४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.idbibank.in/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe