मुक्तपीठ टीम
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच डीजीसीएने एअरलाइन स्पाइसजेटला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. स्पाइसजेटला त्यांच्या बोईंग-७३७ मॅक्स विमानाच्या पायलटला खराब सिम्युलेटरवर प्रशिक्षण दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. विमानाच्या सुरक्षेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.
विमान कंपनीला नोटीस बजावण्यात आली
१. मिळालेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गेल्या महिन्यात स्पाईसजेटच्या ९० वैमानिकांना योग्य प्रशिक्षण न दिल्याने मॅक्स विमान चालवण्यापासून रोखले होते.
२. या वैमानिकांवर बंदी घातल्यानंतर नियामकाने एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली
त्याच वेळी, एका अधिकाऱ्याने सांगितले की, एअरलाइनद्वारे दिले जात असलेल्या प्रशिक्षणाचा उड्डाण सुरक्षेवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच ही बंदी घालण्यात आली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पाइसजेटला त्यांच्या मॅक्स विमानाच्या पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी दोषपूर्ण सिम्युलेटर वापरल्याबद्दल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.