मुक्तपीठ टीम
केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा परीक्षा २०२१चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार, श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंतिम निकालानुसार अशा सर्व उमेदवारांची यादी करण्यात आली आहे ज्यांची शेवटी नियुक्तीसाठी निवड झाली आहे. मुख्य परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी टप्प्यात, नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम टप्प्यात बसलेले उमेदवार, आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, www.upsc.gov.in वर ही यादी तपासू शकतात.
UPSC 2021 चे टॉप विद्यार्थी
- प्रथम स्थान – श्रुती शर्मा
- द्वितीय क्रमांक- अंकिता अग्रवाल
- तृतीय क्रमांक – गामिनी सिंगला
- चौथे स्थान – ऐश्वर्या वर्मा
- पाचवा क्रमांक – उत्कर्ष द्विवेदी
- सहावे स्थान – यक्ष चौधरी
- सातवे स्थान – सम्यक एस. जैन
- आठवे स्थान – इशिता राठी
- नववे स्थान – प्रीतम कुमार
- दहावे स्थान – हरकिरत सिंह रंधावा
UPSC परीक्षा २०२१
जाहिरात मार्च २०२१ मध्ये प्रसिद्ध होऊन मे २०२२ अंतिम निकालMPSC ची संयुक्त मुख्य परीक्षा २०२० कोर्टात अडकून,२०२१ च्या परीक्षांचे निकाल, उत्तरतालिका रखडल्या आहेत.
UPSC वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करत असेल तर MPSC का नाही?
UPSC २०२३ चे वेळापत्रक देखील जाहीर👇 pic.twitter.com/OH3kZrO2St
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) May 30, 2022
UPSC परीक्षा ते निकाल…
- यूपीएससीने ४ मार्च २०२१ रोजी अधिसूचना जारी करून सीएसई २०२१ साठी नोंदणी सुरू केली होती आणि शेवटची तारीख २४ मार्च होती.
- यानंतर २७ जून रोजी प्राथमिक परीक्षा घेण्यात आली, ज्याचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.
- यानंतर ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि १७ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यानंतर ५
- एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत मुलाखतीच्या फेऱ्या घेण्यात आल्या.
UPSCला वेळेवर निकाल जमतो, मग MPSCला का नाही?
- UPSCने अंतिम निकाल जाहीर करण्याची तारीख आधी ठरवलेली नसते.
- व्यक्तिमत्व चाचणीचा टप्पा संपल्यानंतर अंतिम निकाल आठवडाभरात घोषित केले जात आहेत.
- UPSC २०२१ च्या मुख्य परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांची मुलाखत फेरी ५ एप्रिलपासून सुरू होऊन २६ मे २०२२ रोजी संपली होती.
- त्यानंतर आता ३० मे रोजी निकाल जाहीर झाला आहे.
एमपीएससीचे २०२०च्या परीक्षेचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत
- UPSC परीक्षा २०२१ जाहिरात मार्च २०२१ मध्ये प्रसिद्ध होऊन मे २०२२ अंतिम निकाल
- MPSC ची संयुक्त मुख्य परीक्षा २०२० न्यायालयाच्या फेऱ्यांमध्ये अडकून २०२१ च्या परीक्षांचे निकाल, उत्तरतालिका रखडल्या आहेत.
- UPSC वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करत असेल तर MPSC का नाही?
- UPSC २०२३ चे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे.
- एमपीएससी आंदोलनातील सुभाष शेळके आणि अन्य परीक्षार्थींनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.