Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जाहिरात केली, पण एमएमआरडीएचे २४ कोटी लक्ष्य मीडियाने दिलेच नाहीत!

सुशोभीकरण आणि जाहिरातीचे कंत्राट

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MMRDA cheated by laqshya media limited

मुक्तपीठ टीम

मोठा गाजावाजा करत एमएमआरडीए प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सांताक्रूझ ते प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपूल, वांद्रे पर्यंत सुशोभीकरण आणि जाहिरातीचे कंत्राट मे. लक्ष्य मीडिया लिमिटेडला दिले होते ,पण आजमितीला २० महिने उलटूनही एक दमडीही लायसेन्स फी अदा केली नसल्याची धक्कादायक कबूली एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीत दिली आहे. सद्यस्थितीत एमएमआरडीएचे मे. लक्ष्य मीडिया लिमिटेडने २४ कोटी दिलेले नाहीत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाला विचारले होते की एमएमआरडीए प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सांताक्रूझ ते प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपूल, वांद्रे पर्यंत सुशोभीकरण आणि जाहिरातीचे कंत्राट दिले असून आजमितीला प्रलंबित लायसेन्स फी बाबत माहिती देण्यात यावी. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांना सर्व कागदपत्रे देत स्पष्ट केले आहे की निविदेमध्ये नमुद केल्यानुसार मे. लक्ष्य मीडिया लिमिटेड यांच्या मार्फत रुपये १ कोटी ३३ लाखांची बँक गॅरंटी प्राधिकरणास प्राप्त झालेली आहे. परंतु अद्यापपर्यंत मे. लक्ष्य मीडिया लिमिटेड यांच्या मार्फत प्राधिकरणास लायसेन्स फी भरणा करण्यात आलेली नाही.

एमएमआरडीए प्रशासनाने दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी १५ वर्षासाठी ऑफर पत्र दिले. याबाबत एमएमआरडीए प्रशासनाने दिनांक ४ मार्च २०२० रोजी निविदा जारी केली होती. दिनांक ७ डिसेंबर २०२० रोजी मे. लक्ष्य मीडिया लिमिटेडला कार्यादेश देण्यात आले. यात ८२ ठिकाणी ३१९९.८४ चौरस मीटरच्या जाहिरातीची परवानगी देण्यात आली. प्रत्येक वर्षी ५ टक्के वाढ या शर्तीवर १५ वर्षाचा करार करण्यात आला. लायसेन्स फी १३ कोटी ३० लाख ३३ हजार ३९० रुपये निश्चित करण्यात आली. आजमितीला मे. लक्ष्य मीडिया लिमिटेड तर्फे एक दमडीही भरली गेली नाही.

अनिल गलगली यांनी मे. लक्ष्य मीडिया लिमिटेडला काळया यादीत टाकण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवास यांना पत्र पाठविले आहे. मागील २० महिन्यांपासून एक दमडीही न भरणाऱ्या मे. लक्ष्य मीडिया लिमिटेडवर कोणाची मेहरबानी आहे? याची चौकशी करत व्याजासह पैसे वसूल करत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.


Tags: Anil GalgaliLAQSHYA MEDIA LIMITEDMMRDAmumbaiएमएमआरडीएलक्ष्य मीडिया
Previous Post

तात्काळ भरा गाडीचा थर्ड पार्टी विमा…१ जूननंतर दंडात मोठी वाढ, कारावासाचीही शिक्षा!

Next Post

फडणवीस म्हणतात, तिसरा उमेदवार विचारपूर्वक दिला! आमचे उमेदवार स्थानिकच!!

Next Post
Devendra Fadnavis And dhananjay Mahadik

फडणवीस म्हणतात, तिसरा उमेदवार विचारपूर्वक दिला! आमचे उमेदवार स्थानिकच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!