मुक्तपीठ टीम
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी १० उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपासून तरुणांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसने महाराष्ट्र व राजस्थानात राज्याबाहेरील व्यक्तीस उमेदवारी दिल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा आणि काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.
पवन खेरा यांचे नाव या यादीत नसल्याने त्यांनी एक सूचक ट्वीट केलं. कदाचित माझ्या तपश्चर्येत काहीतरी कमी राहिली असेल, असं सूचक ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटनंतर काही वेळातच खेरा यांना सोशल मीडियावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पाठिंबा मिळू लागला. मात्र, सोमवारी पक्षाच्या प्रवक्त्यांचा सूर बदला. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ‘मला काँग्रेसने ओळख दिली आहे. मी माझ्या मताशी सहमत आहे आणि त्यावर ठाम आहे.
महाराष्ट्रातील एकमेव राज्यसभा जागा यूपीतील सुपरफ्लॉप इम्रान प्रतापगढींना!
- महाराष्ट्रात काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.
- त्यामुळे राज्यसभेची एकच जागा सहजच निवडून आणणं शक्य आहे.
- त्यामुळे त्या एका जागेसाठी मोठी चुरस होती.
- मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या यादीत स्थानिकांऐवजी उत्तरप्रदेशातील इम्रान प्रतापगढींना उमेदवारी दिल्याचे जाहीर झाले.
- इम्रान प्रतापगढी यांचा सपा उमेदवाराने साडे पाच लाख मतं घेत दारुन पराभव केला होता.
- केवळ प्रियंका गांधींच्या जवळचे असल्याने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभा उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे.
- त्यामुळे स्थानिक इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.
- महाराष्ट्रातून यूपीच्या इम्रान प्रतापगढींना उमेदवारी देतानाच महाराष्ट्रातील मुकुल वासनिकांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे.
राजस्थानमधून तीन उपरे उमेदवार!आमदाराचा आक्षेप!!
- काँग्रेसची बाजू माध्यमांमध्ये जोरदारपणे मांडणाऱ्या पवन खेरा यांना उमेदवारी देण्यात येण्याची अपेक्षा होती.
- मात्र, तेथे त्यांच्याऐवजी काँग्रेसने मुकुल वासनिकांसह रणदीप सिंग सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी या उपऱ्यांनाच उमेदवारी दिली आहे.
- यापैकी कोणीही मूळचे राजस्थानचे नाहीत.
- सिरोही येथील काँग्रेसचे आमदार संयम लोढा यांनी ट्विट करून विचारले की, “राजस्थानमधील काँग्रेसच्या एकाही नेत्याला/कार्यकर्त्याला राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार न करण्याचे कारण काय आहे हे काँग्रेस पक्षाने सांगावे?”
काँग्रेसच्या नेत्या अभिनेत्री नगमा यांचीही नाराजी!
- नगमा यांनी पवन खेरांशी दर्शवत त्यांचे ट्वीट रिट्वीट करत नाराजी व्यक्ती केली आहे. ‘इमरान भाई’ (इमरान प्रतापगढ़ी) यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. नगमा म्हणाल्या, “मी सोनिया गांधींच्या सांगण्यावरून पक्षात सामील झाले होते, तेव्हा सोनिया गांधींनी मला २००३-०४ मध्ये राज्यसभेत सहभागी होण्याचे वैयक्तिकरित्या वचन दिले होते.
- तेव्हापासून १८ वर्षे झाली, मला संधी मिळाली नाही. इम्रान यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. मी विचारते की, माझी पात्रता काय कमी आहे?
- त्याचवेळी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद यांनी तपस्येचंच म्हणाल तर गुलाम नबी आझादसारख्या नेत्यांची ४० वर्षांची तपस्या कामाला आली नसल्याची टीका केली आहे.
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी हे १० उमेदवार!
- तामिळनाडू- पी. चिदंबरम
- कर्नाटक-जयराम रमेश
- हरियाणा- अजय माकन
- राजस्थान- रणदीप सुरजेवाला,मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी
- मध्य प्रदेश- विवेक तंखा
- छत्तीसगड- राजीव शुक्ला आणि रंजित रंजन
- महाराष्ट्र- इम्रान प्रतापगढी