मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५२९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३२५ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३४,७६४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०८,६४,४२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८५,३९४ (०९.७५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २७७२ सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात प्रथमच बीए . ४ आणि ५ व्हेरियंट
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या समन्वयाने सुरु असणा-या जनुकीय क्रम निर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात बी.ए. ४ व्हेरियंटचे ४ तर बी.ए. ५ व्हेरियंटचे ३ रुग्ण आढळून आले आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळले असून इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर ( आयबीडीसी) फरिदाबाद या संस्थेने याची पुष्टी केली आहे.
या ७ रुग्णांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे –
- हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहेत आणि ४ मे ते १८ मे२०२२ या कालावधीतील आहेत.
- यातील ४ पुरुष तर ३ महिला आहेत.
- यातील ४ जण ५० वर्षांवरील आहेत तर २ जण २० ते ४० वर्षे या वयोगटातील आहेत तर एकजण १० वर्षां खालील आहे.
- यातील दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका , बेल्जियम प्रवासाचा इतिहास आहे तर तर३ जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे. दोन रुग्णांचा कोणताही प्रवासाचा इतिहास नाही.
- यातील ९ वर्षाचा एक मुलगा वगळता सर्वानी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तर एकाने बूस्टर देखील घेतलेला आहे.
- यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.
बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरुन लक्षात आले आहे.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८५,३९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ३३०
- ठाणे ५
- ठाणे मनपा ३८
- नवी मुंबई मनपा ३१
- कल्याण डोंबवली मनपा ९
- उल्हासनगर मनपा ०
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ९
- पालघर २
- वसईविरार मनपा ५
- रायगड १०
- पनवेल मनपा ९
- ठाणे मंडळ एकूण ४४८
- नाशिक ०
- नाशिक मनपा १
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर १
- अहमदनगर मनपा ०
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ३
- पुणे २२
- पुणे मनपा ३२
- पिंपरी चिंचवड मनपा ६
- सोलापूर ३
- सोलापूर मनपा ०
- सातारा १
- पुणे मंडळ एकूण ६४
- कोल्हापूर ०
- कोल्हापूर मनपा ०
- सांगली ०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ३
- कोल्हापूर मंडळ एकूण ३
- औरंगाबाद ०
- औरंगाबाद मनपा ०
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ०
- लातूर ०
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ०
- बीड १
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण २
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती १
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ०
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ३
- नागपूर ५
- नागपूर मनपा ०
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ६
एकूण ५२९
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, २८ मे २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.