मुक्तपीठ टीम
नवी मुंबईतील सिडकोच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स या गोल्फ मैदानावर २० फेब्रुवारी २०२१ रोजी ‘सिडको मास्टर्स कप – २०२१’ या गोल्फ सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस यांसह मुंबई आणि पुण्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब (बीपीसीजी), विलिंग्डन गोल्फ क्लब, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट, पूना गोल्फ क्लब, युएस क्लब आणि गोल्डन स्वान या गोल्फ क्लबमधील गोल्फपटू या सामन्यामध्ये सहभागी होणार आहेत. या प्रसंगी सध्याच्या गोल्फ कोर्सचा १८ होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार आणि आधुनिक सुविधांसह कंट्री क्लब विकसित करण्याच्या आराखड्यांचे अनावरणही करण्यात येणार आहे. या सामन्याचे आणि अनावरण समारंभाचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या समाजमाध्यमांवर करण्यात येणार आहे.
“पहिल्या सिडको मास्टर्स कप २०२१ सामन्याचा प्रारंभ होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नजीकच्या काळात खारघर व परिसरात साकार होत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे खारघर भविष्यातील संधींनी अत्याधुनिक नोड बनणार आहे. त्याचबरोबर खारघर नोड हा भविष्यातील स्पोर्ट्स हब बनण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. सध्याचे गोल्फ कोर्स १८ होल्सचे करण्यात आल्यानंतर
व्यावसायिक सामन्यांचे आयोजन करणे शक्य होणार असून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय पर्यटनासही चालना मिळणार आहे.”
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत विस्तीर्ण नोड असून नजीकच्या काळात खारघर व परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरो सिटी, परिवहन केंद्रित गृहनिर्माण योजना, मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, मेडी सिटी, सेंटर फॉर एक्सलन्स, खारघर हिल्स प्लेट्यु असे महत्त्वाचे प्रकल्प साकार होणार असल्याने हा नोड निवासी, वाणिज्यिक, परिवहन व सांस्कृतिक सुविधांनी परिपूर्ण असणार आहे.
त्याचप्रमाणे सिडकोचे खारघर व्हॅली गोल्फ कोर्स मैदान व सेंटर ऑफ एक्सलन्समुळे खारघरला आंतरराष्ट्रीय नकाशावरदेखील मानाचे स्थान प्राप्त होणार आहे. गोल्फसारख्या प्रतिष्ठीत खेळाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने आयोजित करून राज्याच्या व देशाच्या पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोतर्फे खारघर नोडमध्ये ५२ हेक्टरवर खारघर व्हॅली गोल्फ कोर्स मैदान विकसित करण्यात आले आहे. विस्तीर्ण हिरवीगार जमीन, पार्श्वभूमीला खारघर परिसरातील हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि या डोंगररांगांवरून वाहत येणारे लहानमोठे जलप्रपात, या निसर्गसौंदर्याचा कल्पकतेने वापर करून खारघर येथील गोल्फ कोर्स मैदान विकसित करण्यात आले आहे. गोल्फ कोर्समध्ये सिडकोचा मॅग्नम-ओपस गोल्फ व कंट्री क्लब, ७२ पार व ७,१३७ यार्डचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ९ होल्सचे गोल्फ कोर्स यांचा समावेश होतो. भविष्यात सदर ९ होल्सचे गोल्फ कोर्स 18 होल्सचे करण्यात येणार असून त्याचबरोबर क्लब हाउससह पूर नियंत्रणासाठी डिटेन्शन पॉन्ड, निवासी वापरासाठी आलीशान व्हीला, पंचतारांकित उपहारगृह, निवासी वापरासाठी अपार्टमेन्ट/बंगले या सुविधाही विकसित करण्यात येणार आहेत.