मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात राज्यसभेच्या पाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्राच्या १० विधानपरिषदेच्या जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. ९ जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत आणि २० जूनला मतदान व मतमोजणी होणार आहे. २२ जुलै रोजी विधान परिषदेच्या १० सदस्यांची मुदत संपत आहेत.
निवडणुक कार्यक्रम
- २ जून रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.
- ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
- १० जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल.
- १३ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असेल.
- २० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडेल.
- २० जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल.
या आमदारांचा कार्यकाळ संपतोय…
- रामराजे नाईक निंबाळकर- राष्ट्रवादी काँग्रेस
- संजय दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस
- सुभाष देसाई- शिवसेना
- दिवाकर रावते- शिवसेना
- प्रवीण दरेकर- भाजपा
- सदाभाऊ खोत- भाजपा
- विनायक मेटे- भाजपा
- सुजितसिंह ठाकूर- भाजपा
- प्रसाद लाड- भाजपा
- रामनिवास सिंग- भाजपा
कुणाला संधी मिळणार?
- विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता आहे.
- भाजपा आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ आहे. त्यामुळे भाजपाच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात.
- त्यामुळेच आता या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपा पुन्हा विधान परिषदेवर पाठवू शकते. सदाभाऊ खोत पुन्हा वर्णी लागावी म्हणून प्रयत्नशील आहेत.
- राष्ट्रवादीचे ५४, शिवसेना ५६ आणि कॉंग्रेसचे ४५ आमदार आहेत.
- शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना देखील पुन्हा संधी मिळू शकते. दिवाकर रावते यांच्याबाबतीत मात्र पक्ष विचार करु शकतो.
- दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीतले बडे नेते आहेत. तसेच सध्या ते विधान परिषदेचे सभापती देखील आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.
- तर काँग्रेसचा कोणताही आमदार निवृत्त होत नसला तरी एका संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेवर जाऊ शकतो.