मुक्तपीठ टीम
गेल्या काही वर्षांपासून देशात सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण केले जात आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील आणखी दोन बँकांचे खासगीकरण होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक या दोन बँकांचे खासगीकरण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
नीती आयोगाने केली होती खासगीकरणाची शिफारस
- सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे खासगीकरण केले जाईल.
- याशिवाय, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉन्कोर) च्या धोरणात्मक विक्रीतील काही समस्यांचे निराकरण केल्यानंतर, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
- नीती आयोगाने या बँकांच्या खासगीकरणाची शिफारस केल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली होती.
कशी असेल प्रक्रिया?
- निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत, कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिवांचा मुख्य गट, त्याच्या मंजुरीसाठी पर्यायी यंत्रणेकडे (AM) शिफारस पाठवेल.
- यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल.