Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करावी”

उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

February 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
nilam gorhe

मुक्तपीठ टीम

परिसरातील ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज असून ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

 

विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आमदार मंगेश कुडाळकर यांनी नेहरु नगर, कुर्ला (पूर्व) येथे भोंग्यांच्या आवाजाने होत असलेल्या ध्वनी प्रदुषणाबाबत निवेदन सादर केले. यावेळी पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके, उपसचिव शु. द. आहेर, अतिरिक्त पोलीस आयुक्त,मुंबई प्रविण दराडे, पोलीस उपायुक्त विजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हर्षवर्धन आदी अधिकारी उपस्थित होते.

 

निवेदनात काय?

  • कोरोना प्रादुर्भावाच्या समस्येमुळे ऑफिसची कामे, मुलांच्या ऑनलाईन शाळा, कॉलेज तसेच इतर कामे घरातुन केली जातात.
  • परिसरात भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता अधिक असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होत आहेत.
  • या समस्यांबाबत स्थानिक पोलीसांकडे बैठका घेण्यात आल्या आहेत.

“सर्व समाजातील सण-उत्सव सतत सुरु असतात. भोंग्यांना दिलेल्या परवानगीबाबत शहानिशा करून शहरात ध्वनी प्रदुषण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच शांतता समिती बैठकीत सर्व समाजातील लोकांना विश्वासात घेऊन भोंग्यांचा आवाज नियमानुसार असावा यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ व पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी”, असे निर्देश उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

“ध्वनी प्रदुषणासंदर्भात १० मिनिटांचे सादरीकरण तयार करुन सर्व जनतेमध्ये जागृती करावी. न्यायालयाच्या निर्णयांचा अभ्यास करुन पोलीसांनी ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी”, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

 


Tags: neelam gorhenoise pollutionउप सभापती डॉ. नीलम गोऱ्हेध्वनीप्रदुषण
Previous Post

नखं सारखी तुटतात…ओळखा धोका!

Next Post

महाराष्ट्राच्या एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Next Post
maharashtra-mantralaya

महाराष्ट्राच्या एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!