मुक्तपीठ टीम
महिंद्रा स्कॉर्पिओचे नवीन व्हर्जन २७ जून रोजी लॉंच होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. कंपनी त्यांच्या जाहिरातींसाठी खूप अॅक्टिव्ह आहे. नवीन महिंद्रा एसयूव्हीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होत आहेत. यामुळे त्याची चर्चा अगदी जोरात आणि जोशात सुरू आहे.
नव्या स्कॉर्पिओ एनचा ट्विटरवर व्हिडीओ व्हायरल
- महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी स्कॉर्पिओ एनचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
- ट्विटमध्ये त्यांनी द बीस्ट असे लिहिले आहे. The Beast. About to be uncaged म्हणजेच पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी सज्ज आहे.
- आनंद महिंद्रा यांनी स्कॉर्पिओ एनचे वर्णन एक मोठा आणि धोकादायक प्राणी असे केले आहे.
‘स्कॉर्पिओ क्लासिक’ सुरू राहणार
- नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ४x४ पर्यायांसह ऑफर केली जाईल.
- सध्याची स्कॉर्पिओ जी गेल्या २० वर्षांमध्ये विकसित झाली आहे ती ‘स्कॉर्पिओ क्लासिक’ म्हणून सुरू राहील.
- महिंद्राने २७ जून २०२२ रोजी द ऑल-न्यू स्कॉर्पिओ-एन कमिंग या कॅप्शनसह यूट्यूब व्हिडीओ जारी केला.
- नवीन स्कॉर्पिओ एनचे खास फिचर्स
- मुंबईत महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओद्वारे डिझाइन केलेली, नवीन स्कॉर्पिओ मागील मॉडेलपेक्षा मोठी असेल.
- २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ-एन नवीन फिचर्स आणि नवीन लेआउटसह सक्षम असेल.
- नवीन स्कॉर्पिओ एनचे सिल्हूट महिंद्रा XUV700 सारखे आहे.
स्कॉर्पिओ एन असणाऱ्या सोयी-सुविधा
- महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या बाहेरील भागात ट्विन-पॉड एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, नवीन महिंद्र लोगो, मोठी विंडो फ्रेम आणि बरेच काही मिळेल.
- इंटीरियरमध्ये मोठे टचस्क्रीन इंफॉर्मेशन डिस्प्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, इनर ऑटो-डिमिंग रिअर-व्ह्यू मिरर, अॅड्रेनॉक्स कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळते.
पाहा व्हिडीओ: