मुक्तपीठ टीम
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंसोबतच कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या नावाचीही चर्चा होती. तसेच संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेवरून अनेक तर्कवितर्क काढले जात होते. मात्र आता या सर्वांना फुल स्टॉप लागला असून, शिवसेनेने सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची निवड केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे.
शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार…
- शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींसोबतच चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती.
- संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली.
- त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं.
- मंगळवारी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
- त्यामुळे सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी शिवसेना कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली होती.
- अखेर सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची निवड केली आहे.
- अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कोण आहेत संजय पवार?
- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाता.
- १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
- एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली.
- शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.
- करवीर तालुका प्रमुख, चार वर्षे शहरप्रमुखपदी काम केलेले पवार गेली १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
- युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली.