मुक्तपीठ टीम
चेन्नईमध्ये आज, १८ फेब्रुवारीला आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावामध्ये १६४ भारतीय आणि १२५ परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. एप्रिलमध्ये होणारा या आयपीएल हंगामासाठी आठ संघात फक्त ६१ जागा शिल्लक आहेत. या शिल्लक जागांसाठी एकूण २९२ खेळाडूंना निवडण्यात आले आहे.
लिलावात सहभागी झालेल्या १० खेळाडूंनी त्यांची बेस्ट प्राइस २ कोटी इतकी ठेवली आहे. तर २२ खेळाडूनी १.५ कोटी तर ११ खेळांडूनी १ कोटी इतकी आपली बेस्ट प्राईस ठेवली आहे. मात्र, सदर लिलावात भारतातील पाच खेळाडूंनी निवड होणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे. कोण आहेत हे खेळाडू पाहूयात…
चेतेश्वर पुजारा
- भारतीय कसोटी संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा आयपीएल २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता.
- त्यानंतर आठही संघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
- यावर्षी पुजाराने स्वत:ची बेस प्राइस ५० लाख इतकी ठेवली आहे.
- पुजारा हा कसोटीपटू आहे. त्यामुळे यापूर्वी कोणताही संघाने त्याच्यावर बोली लावलेली नाही.
- त्यामुळे यावर्षी देखील लिलावात पुजाराकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता आहे.
उमेश यादव
- उमेश यादव भारतीय संघातील जलद गोलंदाज आहे.
- पण उमेश गेल्या काही सामन्यात सातत्याने विकेट मिळवण्यात अपयशी ठरतो आहे.
- गेल्या वर्षाच्या हंगामात तो अपयशी ठरला होता. दोन सामन्यात फक्त दोन विकेट त्याला मिळवता आल्या.
- यावर्षी लिलावात त्याने स्वत:ची बेस प्राइस १ कोटी इतकी ठेवली आहे.
- या किंमतीत अनेक जलद गोलंदाज आहेत. इतक नव्हे तर उमेश मोठ्या कालावधीपासून मर्यादीत षटकांचे सामने खेळला नाही.
- त्यामुळे लिलावात त्याची खरेदी होणे कठीण दिसते.
हरभजन सिंग
- दोन कोटी बेस प्राइस असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये हरभजनचा देखील समावेश आहे.
- काही कालावधीपासून हरभजन क्रिकेटपासून लांब आहे.
- त्यामुळे त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी दिसते आहे.
पियुष चावला
- कोलकाता नाइट रायडर्सचा मुख्य फिरकीपटू असलेला पियुष चावला गेल्या वर्षी चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला होता.
- पियुषने सात सामन्यात ६ विकेट घेतल्या.
- पियुषच्या खराब कामगिरीमुळे लिलावात चावलाची खरेदी होण्याची शक्यता कमीच दिसते आहे.
केदार जाधव
- गेल्या हंगामात केदार जाधवची कामगिरी खराब झाली होती. ८ सामन्यात त्याने फक्त ६२ धावा केल्या होत्या.
- २०१९ मध्ये देखील केदारने १४ सामन्यात फक्त १६२ धावा केल्या होत्या.
- फक्त खराब फॉर्म नव्हे तर केदारची बेस प्राइस देखील त्याच्या विरुद्ध जाऊ शकते.
- केदारने त्याची बेस्ट प्राइस २ कोटी इतकी ठेवली आहे.
- केदारच्या कामगिरीवरून लिलावात त्याच्यावर बोली लावली जाईल असे वाटत नाही.