मुक्तपीठ टीम
अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सचा महत्वाचा ब्रँड असलेली शेवरले २०१७ मध्ये भारतीय बाजारातून बाहेर पडली. शेवरलेने नुकतीच इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. या इलेक्ट्रीफाईड कारचे नाव कॉर्व्हेट असेल, जी पुढील वर्षी बाजारात येऊ शकते. या मॉडेलसह शेवरलेट भारतात पुनरागमन करू शकते.
शेवरलेचं ईव्हीमधून भारतात पुनरागमन!
- ऑल-व्हील-ड्राइव्ह सेट-अप टीझर व्हिडिओमध्ये दिसू शकतो आणि पार्श्वभूमीत V8 इंजिनमधून आवाज येतो, जो हायब्रिड आवृत्ती दर्शवतो.
- जनरल मोटर्सचे सीईओ मार्क रीस यांनी देखील लिंक्डइनवर पुष्टी केली की पहिले इलेक्ट्रीफाईड कॉर्व्हेट २०२३ मध्ये लाँच होणार आहे आणि इलेक्ट्रिक एडिशन जीएमच्या नवीन अल्टियम प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल.
अद्याप संपूर्ण माहिती उघड नाही…
- पहिल्या इलेक्ट्रीफाईड कॉर्व्हेटमध्ये इंजिनच्या संयोगाने काम करणारी एक छोटी बॅटरी असेल
- बॅटरीची पुढची चाके ट्विन मोटर्सद्वारे विजेवर चालणार तर V8 मागील बाजूस असेल.
- दोन्ही गाड्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.
- शेवरलेटने २०१५ मध्ये कॉर्व्हेट ई-रे नावाचा ट्रेडमार्क तयार केला होता तो कदाचित इलेक्ट्रिक एडिशनसाठी वापरला जाईल.
- अधिक माहिती काही दिवसात समोर येईल.