मुक्तपीठ टीम
शेतकऱ्याचे जीवन हे कष्टदायी असते. अनेकदा कष्टानं मिळवलेल्या पीकासाठी योग्य तो भावही मिळत नाही. तेव्हा काही शेतकरी संतापाने टोमॅटो किंवा कांदा रस्त्यावर फेकतात. मात्र बुलढाण्यातील एक शेतकरी धनानं नसला तरी मनानं कुबेर आहे. कांद्यात नुकसान झाल्यावरही त्याने तब्बल २०० क्विंटल कांद्याचे मोफत वाटप केले. कैलास नारायण पिंपळे असे या हतबल शेतकऱ्याचे नाव असून तो शेगावच्या रहिवाशी आहे.
नुकसान सोसूनही दाखवलं मोठं मन!
- कैलास नारायण पिंपळे असे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपला कांदा खामगाव आणि शेगावच्या बाजारात नेला होता.
- मात्र भाव तर सोडाच सदर कांदा कुणी घ्यायलाही तयार नसल्याने शेतकऱ्याने हतबल होऊन हा कांदा पार्ट आपल्या घरी आणला.
- कांदा पडून- पडून खराब होईल म्हणून शेतकरी पिंपळे यांनी सादर कांदा घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.
- मोफत कांदे देत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे मोफत कांदा वाटप आंदोलन!
- कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतातून तो बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च देखील कांदा उत्पादनातून मिळत नसल्याने बुलढाणा
- जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
- या कांद्याने शेतकऱ्यांना रडविल्याने इतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात मोफत कांदा वाटप
- आंदोलन करुन शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.