मुक्तपीठ टीम
“शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांनी खालच्या पातळीवर जाऊन भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे. त्या काय बोलताय याच भानही त्यांना राहत नाही. त्यामुळे दीपाली सय्यद यांनी आपला वकूब ओळखावा , औकात ओळखावी मगच वक्तव्य करावी,” अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केली आहे. दीपाली सय्यद यांची टीका म्हणजे काजव्यानं सूर्यावर थुकण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले.
अगं अगं पांढरे पाली… तुझ्या औकातीची कीव आली
कोण तू ? तुला कोण पुसते ? तुझ्या वकुबात रहा कुणाला बोल लावते? … या भिंतीवरून त्या भिंतीवरी फिरते….— Ajit Chavan (@ajitchavanbjp) May 17, 2022
दिपाली साययद या बाद नटीचा, बाद असंच म्हणतो मी खरंतर त्या महिला आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान राखून हे वक्तव्य मी करतोय की, दिपाली सय्यद आपल्या औकातीत राहा आपला वकूब काय? आपण बोलतो काय? आपण कोणाला बोलतो? याचही भान आपल्याला नसावं? दिपाली साय्यद ह्यांनी ज्या पद्धतीनं अतिशय खालच्या पातळीवरच्या शब्दात जाऊन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती टीका केलेली आहे त्यांनी आपला वकूब ओळखावा आपली औकात ओळखावी आणि त्यानंतरच या पुढे वक्तव्य करावं
ते पुढे म्हणाले की, खरंतर कोणी खिसगणतीतही घेऊ नये आणि उत्तरही देऊ नये या लायकीच्या दिपाली सय्यद आहेत त्यांची तेवढी पात्रता नाही. राजकारणामध्ये आपलं स्थान काय आहे हे ओळखा. दीपाली सय्याद यांनी केलेली टीका म्हणजे काजव्यानं सूर्यावरती थुंकण्यासारखा आहे. दिपाली साय्यद आपण महिला आहात आपला सन्मान म्हणून हा इशारा देतोय. या पुढं भारतीय जनता पक्षाचा नेत्यांच्या बाबतीत बोलताना आपण आपली बाष्कळ बडबड करू नये आणि बेताल वक्तव्य करू नये.
अजित चव्हाण यांनी दिपाली सय्यद यांना इशारा दिला की, त्यांचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि महाराष्ट्र सरकारला गृह विभागाला देखील माझा म्हणणं आहे की आपल्या नेत्यांच्या विरोधात टीका केलेल्या लोकांना तुम्ही जेल मध्ये टाकता मग हे काय आहे? आणि महाराष्ट्रामधल्या काही अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन बोलणाऱ्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ करणाऱ्या नेत्यांनादेखील बघावे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा आपण कुठे नेऊन ठेवलाय? गल्लीतले कार्यकर्तेसुद्धा आता पातळी सोडून बोलायला लागलेत.