Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा ‘कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमा’त सहभाग

February 18, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
kusumagraj

मुक्तपीठ टीम

 

बालपण म्हटलं तर सध्या टिव्ही कार्टून, मोबाईल गेममध्ये रमणारी पिढी. मात्र पिढीची प्रतिनिधी तरीही यास अपवाद असलेली गडचिरोली जिल्हयाची विनंती झाडे साहित्यात रमणारी आहे. साडेतीन वर्षाच्या विनंतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता तोंडपाठ करून परिचय केंद्राच्या कविता वाचन उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी होणारी ती सर्वात कमी वयाची साहित्यरसिक ठरली आहे.

 

‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात राज्यातून व राज्याबाहेरूनही साहित्यरसिक सहभागी होत आहेत. या उपक्रमातील वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड येथील विनंती झाडे या चिमुकलीचा सहभाग. बोबडे बोल असले तरी विनंतीने उत्तम लयीत ‘कणा’ ही कविता सादर करून या उपक्रमातील सर्वात लहान सहभागकर्तीचा मान मिळविला आहे.

 

चिमुकली विनंती दोन वर्षाची असल्यापासूनच बोलायला लागली व बडबडगीते, पाठयपुस्तकातील कविता ती आई वंदना झाडे यांच्या मागून म्हणू लागली. बऱ्याच रचना तिच्या पाठही झाल्या. तिची आई वंदना यांना आवडणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता त्यांनी आपल्या मुलीलाही शिकवली व चिमुकल्या विनंतीने ही कविता तोंडपाठच केली. विनंतीचे वडील तुळशीदास झाडे यांना प्राध्यापक मित्राकडून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमाची माहिती समजली व त्यांनी आपल्या मुलीला या उपक्रमात सहभागी करण्याचे ठरविले. कुरखेडच्या गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या प्रांगणातील लॉनवर विनंती व तिच्या आई-वडिलांनी मोर्चा वळवला व तिचा ‘कणा’ कविता सादरीकरणाचा व्हिडीओ तयार करून घेतला. परिचय केंद्राला हा व्हिडीओ पाठवला. संपादक मंडळाने या व्हिडीओची निवड केली आणि हे सादरीकरण उपक्रमातही सहभागी करून घेतले.

 

विनंतीच्या आईने मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून त्या गृहिणी आहेत. तिचे वडील कुरखेड येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे अंगणवाडीत जाता येत नसल्याने विनंती हिरमुसली आहे तर मोठी झाल्यावर शिक्षिका व्हायचे तिचे स्वप्न आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: कविश्रेष्ठ कुसुमाग्रजकुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रम ‘कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमज्ञानपीठ पुरस्कारमराठी भाषा गौरव दिनवि.वा. शिरवाडकर
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ४,७८७ नवीन कोरोना रुग्ण,  मुंबईत सर्वाधिक ७२१

Next Post

आता अॅमेझॉन उपकरणांचे भारतात उत्पादन, चीनचा पत्ता कट

Next Post
amazon

आता अॅमेझॉन उपकरणांचे भारतात उत्पादन, चीनचा पत्ता कट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!