Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तर कोरियात कोरोनाचा भयावह उद्रेक, हुकूमशहा किम जाँग घाबरले!

May 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
kim jong un

मुक्तपीठ टीम

चीन पाठोपाठ आता उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशाची अधिकृत वृत्तसंस्था KCNA नुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३,९२,९२० नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर, देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १२,१३,५५० झाली आहे. यादरम्यान देशात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. KCNA ने सांगितले आहे की देशात गेल्या २४ तासात १,५२,६०० रुग्ण बरे झाले आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत सुमारे साडेसहा लाख रुग्ण बरे झाले आहेत, तर ५.६४ लाखांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी कडक आदेश जारी केले आहेत.

किम यांचे मार्गदर्शक तत्त्वे

  • कोरोना प्रतिबंधाबाबत जी काही कठोर पावले उचलता येतील आणि ज्यांची गरज भासेल, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
  • एएफपीने राज्य माध्यमांच्या हवाल्याने म्हटले आहे की, किम जोंग उन यांनी लष्कराला औषधांचे वाटप करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
  • एएफपीने वृत्त दिले आहे की, कोरोना महामारीमुळे देशात आतापर्यंत ५० मृत्यू झाले आहेत.

किम यांनी पॉलिट ब्युरोची बैठक बोलावली

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, किम जोंग उन यांनी रविवारी कोरियाच्या वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीची पॉलिटब्युरो बैठक पुन्हा बोलावली, ज्यामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
  • या बैठकीत आरोग्य मंत्रालयाशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.
  • या बैठकीतही किम यांनी अधिकारी, मंत्र्यांना स्पष्ट शब्दात औषधांचा अखंड पुरवठा जलद करण्याच्या आणि साथीच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
  • यामध्ये सर्व राज्यांना वेळेवर औषधांचा पुरवठा होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

औषधांची दुकाने २४ तास सुरू राहतील

  • या बैठकीत किम यांनी सर्व औषधांची दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचे आदेशही जारी केले आहेत.
  • यावेळी त्यांनी सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात कोणतीही चूक करू नये, असा इशाराही दिला आहे.
  • जर कोणी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags: coronaKim Jong UNNorth Koreaउत्तर कोरियाकिम जाँगकोरोना
Previous Post

हवाई इंधन पुन्हा महागलं…विमान प्रवास महागण्याची शक्यता!

Next Post

अदानींनी शिकला अंबानींकडून धडा? खासदारकीचा इन्कार!!

Next Post
Tulsidas Bhoite Article on Adani Entry in politics

अदानींनी शिकला अंबानींकडून धडा? खासदारकीचा इन्कार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!